Uttarakhand Glacier Burst: देवभूमीत जलप्रकोप! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने महापूर; १७०हून अधिक बेपत्ता?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 07:02 AM2021-02-08T07:02:46+5:302021-02-08T07:03:16+5:30

Uttarakhand Glacier Burst: ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला; १० जणांचे मृतदेह सापडले

Uttarakhand Glacier Burst massive damage after glacier burst triggers flood in uttarakhand170-missing | Uttarakhand Glacier Burst: देवभूमीत जलप्रकोप! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने महापूर; १७०हून अधिक बेपत्ता?

Uttarakhand Glacier Burst: देवभूमीत जलप्रकोप! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने महापूर; १७०हून अधिक बेपत्ता?

Next

डेहराडून : उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे रविवारी सकाळी नंदादेवी हिमशिखराचा हिमकडा कोसळून धौलीगंगा, ऋषीगंगा व अलकनंदा या नद्यांना महापूर आला. यात संपूर्ण ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. तेथील १७०हून अधिक कर्मचारी बेपत्ता आहेत. त्यापैकी १० जणांचे मृतदेह हाती लागले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

बेपत्ता कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) व आयटीबीपीच्या जवानांनी बचावकार्य हाती घेतले आहे. हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढून परिसरातील पाच पूल वाहून गेले. 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर केली. पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून या कुटुंबीयांना २ लाखांची तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. (वृत्तसंस्था)

उपचारांसाठी वैद्यकीय यंत्रणाही सज्ज
ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पातील वाहून गेलेल्या कर्मचाऱ्यांना शोधल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावेत म्हणून जोशीमठ येथे ३० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. तसेच डेहराडून, श्रीनगर, हृषिकेश येथील रुग्णालयांमधील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

अतिशय दुर्दैवी घटना : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या महापुरामध्ये ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पातील दीडशेहून अधिक कर्मचारी वाहून गेले ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या नैसर्गिक आपत्तीत सारा देश उत्तराखंडच्या पाठीशी उभा आहे.

बोगद्यातून १६ जणांना सुखरूप बाहेर काढले
ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या एका बोगद्यात काम करीत असलेले सुमारे ५० कर्मचारी या प्रकोपामुळे तिथेच अडकून पडले होते. हे सारे जण मरण पावले असण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु आयटीबीपीच्या जवानांनी यातील १६ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. अन्य कर्मचाऱ्यांच्या शोध सुरू आहे. 

पाच जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा
चामोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून महापूर आल्याने उत्तराखंडमधील पौरी, तेहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार, डेहराडून या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. अलकनंदा नदीतील पाण्याचीही पातळी वाढल्याने तिथेही सतर्कतेच्या सूचना आहेत. 

Web Title: Uttarakhand Glacier Burst massive damage after glacier burst triggers flood in uttarakhand170-missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.