शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Glacier Burst: बोगद्यात अडकलेल्यांना शोधण्यास ड्रोनचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 03:03 IST

बोगद्यात हजारो टन चिखल मातीच्या गाळाचे ढिगारे साचले आहेत. आतापर्यंत ३४ मृतदेह सापडले असून, अन्य १७० जण बेपत्ता आहेत

डेहराडून/तपोवन : उत्तराखंडमध्ये विविध सुरक्षा संस्थेचे जवान गेल्या चार दिवसांपासून बचाव कार्य करीत आहेत. तपोवन बोगद्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि दूरसंवेदी उपकरणांचा वापर केला जात आहे. या बोगद्यात हजारो टन चिखल मातीच्या गाळाचे ढिगारे साचले आहेत. आतापर्यंत ३४ मृतदेह सापडले असून, अन्य १७० जण बेपत्ता आहेत.बोगद्यात अडकलेल्या लोकांचा बचाव करण्यासाठी अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध साधनांचा वापर केला जात आहे, असे उत्तराखंड पोलीसचे मुख्य प्रवक्ते आणि उपमहानिरीक्षक नीलेश आनंद भरणे यांनी घटनास्थळी सांगितले.रविवारी हिमकडा कोसळून ऋषिगंगा आणि धौलीगंगा नदीत अचानक भीषण पूर आला. जलप्रकोपाच्या तडाख्याने ऋषिगंगा जल विद्युत प्रकल्प पूर्णत: उद्‌ध्वस्त झाला असून, तपोवन प्रकल्पाच्या बोगद्यात काम करणारे अनेक लोक अडकले होते. या भीषण आपत्तीनंतर सलग चार दिवसांपासून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. यात लष्कर, एनडीआरएफ, आयटीबीपी, राज्य आपत्ती निवारण दलाचे जवळपास ६०० जवान काम करीत आहेत.

चिखल मातीचे ढिगारे सुकल्याने झाले टणकबचाव पथके बोगद्यात ८० मीटर आत पोहोचले. अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ढिगाऱ्यांतून मार्ग काढावा लागेल. बोगद्यात साचलेले चिखल मातीचे ढिगारे सुकल्याने खूप टणक झाले आहेत. त्यामुळे ढिगारे खोदणे आणखी कठीण झाले आहे. ऋषिगंगा जल विद्युत प्रकल्पातील बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांनी बुधवारी निदर्शने केली. अधिकारी योग्यरीत्या बचाव कार्य करीत नाहीत, असा आरोप या कुटुंबीयांनी केला. 

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा