शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावतांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन    

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 13:39 IST

Uttarakhand CM Tirath Singh Rawat tests corona positive : अलीकडेच तीरथ सिंह रावत हे कुंभ मेळाव्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संतांसह पूजेमध्ये सहभागी झाले होते.

नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat)  यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी त्यांनी ट्विट करून आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. तसेच, तीरथ सिंह रावत यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. (Uttarakhand CM Tirath Singh Rawat tweets that he has tested positive for Covid-19)

"माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मी ठिक आहे आणि मला कोणताही त्रास नाही. डॉक्टरांच्या देखरेखीत मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांत तुमच्यापैकी कोणतीही व्यक्ती माझ्या संपर्कात आली आहे. त्यांनी काळजी घ्यावी आणि स्वत:ची कोरोना चाचणी करावी", असे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, अलीकडेच तीरथ सिंह रावत हे कुंभ मेळाव्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संतांसह पूजेमध्ये सहभागी झाले होते. तसेच, रविवारीही त्यांनी एका खेळाच्या कार्यक्रमात भाग घेतला. याशिवाय, तीरथ सिंह रावत हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते, असे सांगण्यात येत आहे.

("CM साहेब... विचार बदला, तेव्हाच देश बदलेल"; तीरथ सिंह रावतांच्या फाटलेल्या जीन्स विधानावरून हल्लाबोल)

वादग्रस्त विधानामुळे चर्चेतराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भाजपाचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आहेत. तीरथ सिंह रावत हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमामध्ये तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले असून यामुळे नवा वाद निर्माण झाला "आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत," असे विधान तीरथ सिंह रावत यांनी केले होते. यावरून विरोधी पक्षांनी निशाणा साधत तीरथ सिंह रावत यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी केली होती.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा