शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'भाजपामध्ये लोकशाहीला जागा उरली नाही'; भाजपाला राम-राम केल्यानंतर बड्या नेत्याचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 10:27 IST

Yashpal Arya : भाजप सरकारमधील परिवहन व समाज कल्याण अल्पसंख्याक मंत्री यशपाल आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येत्या काही महिन्यात उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण, त्यापूर्वीच भाजप सरकारमधील परिवहन व समाज कल्याण अल्पसंख्याक मंत्री यशपाल आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. 'भाजपमध्ये आता अंतर्गत लोकशाही नावाचा प्रकारच उरला नाही,' असं मत आर्य यांनी भाजप सोडताना व्यक्त केलं.

उत्तराखंडमधील दलिस समाजाचा सर्वात चेहरा असलेल्या कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांच्यासोबत त्यांचे पुत्र आमदार संजीव आर्य हेदेखील काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. यशपाल आर्या यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि राहुल गांधीची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. 

काँग्रेसमध्ये घरवापसी करताना यशपाल आर्य यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना यशपाल आर्य म्हणाले की, 'भाजपमध्ये आता काही लोकांच्या हातात सर्व अधिकार गेले आहेत. पक्षात आता अंतर्गत लोकशाहीला जागा उरली नाही. त्याउलट काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीला फार मोठं महत्व आहे. यामुळेच मी काँग्रसमध्ये पुन्हा येत आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले.

कोण आहेत यशपाल आर्य  ?69 वर्षीय यशपाल आर्य उत्तराखंडच्या राजकारणातील सर्वात मोठा दलित चेहरा आहेत. 1989 मध्ये यशपाल आर्य पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडुन गेले होते. उत्तराखंडच्या स्थापनेपर्यंत ते उत्तर प्रदेशातील आमदार होते. पण, 2002 मध्ये उत्तराखंडच्या निवडणुकीत ते उत्तराखंड विधानसभेचे सदस्य झाले. आतापर्यंत यशपाल आर्य सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. यशपाल आर्य सात वर्षापूर्वी उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे आता काँग्रेस प्रवेशामुळे त्यांची घरवापसी झाली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसUttarakhand Lok Sabha Election 2019उत्तराखंड लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा