शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Assembly Election 2022 : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा, ७० जागांसाठी एकाच टप्प्यात होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 16:26 IST

Election 2022 Date Announcement : या ५ राज्यांपैकी पंजाब वगळता ४ राज्यांमध्ये एनडीएचे सरकार आहे. यांपैकी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी, गोव्यात प्रमोद सावंत, मणिपुरमध्ये नोगथोम्बन बीरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत. या पाच राज्यांत तब्बल १८.३४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

नवी दिल्ली - देशात एकीकडे कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली असतानाच, दुसरीकडे देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा करण्यात आली आहे. येथे एकूण ६९० विधानसभा जागांसाठी निवडणूक होईल. या राज्यांतील निवडणुका भविष्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही महत्वाच्या असल्याचे मानले जात आहे. उत्तराखंडमध्ये एकूण ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल. तसेच १० मार्चला पाचही राज्यांची मतमोजणी होईल. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चिंद्रा यांनी माहिती दिली.

महत्वाचे म्हणजे, १५ जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, सायकल किंवा बाईक रॅली आणि राजकीय सभांना परवानगी नसेल. यानंतर कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेत पुढील नियम जाहीर केले जातील, असेही निवडणुक आयोगाने म्हटले आहे.

या ५ राज्यांपैकी पंजाब वगळता ४ राज्यांमध्ये एनडीएचे सरकार आहे. यांपैकी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी, गोव्यात प्रमोद सावंत, मणिपुरमध्ये नोगथोम्बन बीरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत. या पाच राज्यांत तब्बल १८.३४ कोटी मतदान मतदान करतील.

उत्तराखंडमधील नविडणूक समिकरण -एकूण 70 जागा असलेल्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च 2022 रोजी संपत आहे. मात्र, राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. येथे काँग्रेससह भाजप, आम आदमी पार्टी, बसपा आणि अनेक छोटे पक्ष आपले नशीब आजमावणार आहेत. तथापि, उत्तराखंडची निवडणूक भाजपसाठी सर्वात आव्हानात्मक आहे. कारण येथे गेल्या दोन दशकांपासून दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. पण कांग्रेसला टक्कर देत भाजप सत्ता परिवर्तनाची परंपरा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करेल.

उत्तराखंडमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 57 जागा जिंकल्या आणि प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन केले. तर काँग्रेसला केवळ 11 जागाच मिळाल्या होत्या. यानंतर त्रिवेंद्रसिंह रावत मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना चार वर्षांनी हटवून भाजपने सत्तेची धुरा तीरथसिंह रावत यांच्याकडे सोपवली. मात्र काही महिन्यांतच तीरथ सिंह रावत यांच्या जागी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवण्यात आले. 

टॅग्स :Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२Uttarakhandउत्तराखंडElectionनिवडणूक