शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, यूपीची व्यवस्था सुधारेन, आजोबा बसले आंदोलनाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 20:12 IST

एक दिवसांचा मुख्यमंत्री करा या मागणीसाठी आजोबा आंदोलनाला बसले आहेत.

मथुरा : मथुराचे रहिवासी असलेले प्रकाश चंद्र अग्रवाल यांना अनिल कपूरच्या 'नायक' चित्रपटाप्रमाणे एका दिवसासाठी यूपीचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. या मागणीसाठी ते आता बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. आपल्या मागणीसाठी प्रयागराजच्या पोलीस चौकीबाहेर ते निदर्शने करत आहेत. यूपीमध्ये अनेक यंत्रणा सुधारण्याची गरज आहे आणि अनेक त्रुटी दिसत आहेत. जर एका दिवसासाठी मी मुख्यमंत्री झालो तर ते दूर करेन असे संबंधित आजोबा म्हणत आहेत. खरं तर एक दिवसाच्या कार्यकाळाची रूपरेषाही त्यांनी तयार केली आहे.

प्रकाश अग्रवाल यांनी नायक चित्रपट पाहिला आहे. ते त्यातील अनिल कपूरच्या भूमिकेने फार प्रभावित झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मला प्रशासनाच्या व्यवस्थेत सुधारणा करायची आहे आणि त्यामुळे यूपीचा मुख्यमंत्री बनवले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहे. 

मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी ३ ऑक्टोबरपासून मथुरा येथून धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आजोबांनी प्रयागराज उच्च न्यायालयाजवळील आंबेडकर पुतळ्याजवळ १० ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू केले. यानंतर प्रकाशचंद्र अग्रवाल यांनी तेथून आंदोलनाचे ठिकाण हलवून प्रयागराज येथील पोलीस चौकीवर धरणे आंदोलन सुरू केले.

...म्हणून बनायचे आहे मुख्यमंत्री प्रकाश अग्रवाल यांचे वडील पेशाने दूध व्यावसायिक होते. प्रकाशचंद्र अग्रवाल यांना एक बहीण देखील आहे. प्रकाश अग्रवाल जवळपास ६५ वर्षांचे आहेत, मात्र त्यांनी लग्न देखील केले नाही कारण त्यांना यूपीच्या प्रशासन व्यवस्थेत अनेक सुधारणा करायच्या होत्या. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात भ्रष्ट अधिकारी आणि खराब व्यवस्थेबाबत अनेक जनहित याचिका दाखल केल्या आहेत. मात्र त्यांच्या म्हणण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. या व्यवस्थेत पसरलेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका आणि अनेक याचिकाही दाखल केल्या आहेत.

भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करणार नाही प्रकाशचंद्र अग्रवाल म्हणाले की, १ दिवसासाठी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करणार नाही, तर त्याचे डिमोशन करेन.  त्यांनी एका दिवसासाठी मुख्यमंत्री व्हावे यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, यूपीचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठवले आहे. मात्र त्यांना एका दिवसासाठी मुख्यमंत्री करण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथChief Ministerमुख्यमंत्रीNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान