शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh: 'योगी जी तुम्ही संत आहात, सपाच्या चुका माफ करा आणि आझम खानची सुटका करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 10:02 IST

Uttar Pradesh: मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आझम खान यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली आहे.

लखनौ: ऑल इंडिया तंझीम उलेमा-ए-इस्लामचे राष्ट्रीय सरचिटणीस मौलाना शहाबुद्दीन रिझवी(Maulana Shahabuddin Rizvi) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तुरुंगात कैद असलेल्या आझम खानच्या(Azam khan) सुटकेचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी दोन पत्रे लिहिली आहेत. पहिले पत्र योगी आदित्यनाथ यांना लिहिले आहे, तर दुसरे पत्र सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांना लिहिले आहे.

मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेले पत्रमौलाना शहाबुद्दीन राजवी यांनी मुख्यमंत्री योगींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'आझम खान अडीच वर्षांपासून तुरुंगात आहेत. ते उत्तर प्रदेशमध्ये अनेक वेळा आमदार-खासदार आणि मंत्रीही राहिले आहेत. तुरुंगात त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था नाही. त्यामुळे आझम खानची सुटका करावी. यामुळे मुस्लिमांचा तुमच्याबद्दलचा विचारही बदलेल.'

'तुम्ही संत आहात'याशिवाय मौलाना यांनी लिहिले की, 'तुम्ही यूपीचे प्रमुख तसेच धार्मिक व्यक्ती आणि संत आहात, आम्हाला आशा आहे की समाजवादी पक्षाच्या सरकारमधील चुकीच्या निर्णयाचा आणि कायद्याच्या उल्लंघनाचा सहानुभूतीपूर्वक विचार केल्यानंतर तुम्ही आझम यांच्या सुटकेचा विचार कराल. हे काम तुम्ही केले तर उत्तर प्रदेशातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील मुस्लिमांच्या मनात तुमच्याबद्दलचा विचार बदलेल.'

मुलायमसिंह यादव यांनाही पत्र लिहिले मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी मुलायम सिंह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'मोहम्मद आझम खान हे तुमच्या जुन्या साथीदारांपैकी एक आहेत. संघर्षाच्या दिवसात त्यांनी नेहमीच तुमच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. अखिलेश यादव यांच्यासाठी कन्नौजमध्ये पहिल्यांदा आझम खान यांनी मत मागितले होते. मुस्लिमांनीही त्यांना निवडून आणले. पण, आता जेव्हा त्याच्यावर वाईट वेळ आली आहे, ते एकटे आणि एकाकी उभे आहेत. तुमच्या पक्षाकडून आणि तुमच्या बाजूने कोणतीही मदत झालेली नाही.' 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ