शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

Uttar Pradesh Uttarakhand Exit Poll: दोन राज्यांत भाजप इतिहास घडवण्याच्या तयारीत; मोदी-शहांच्या रणनीतीनं विरोधकांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 20:35 IST

Uttar Pradesh Uttarakhand Exit Poll: पाच वर्षांनंतर सत्ताबदलाची परंपरा असलेल्या राज्यांमध्ये भाजप चमत्कार घडवण्याच्या वाटेवर

नवी दिल्ली: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष इतिहास घडवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता कायम राहणार असल्याचं एक्झिट पोल सांगतात. या दोन राज्यांत दर ५ वर्षांनी सत्ताबदल होतो असा इतिहास आहे. मात्र यंदा भाजप इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे.

उत्तर प्रदेशात कमळच, सपा सत्तेपासून दूरचरिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या काही जागा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा उत्तर प्रदेशमध्ये अडीचशेपेक्षा अधिक जागा जिंकू शकतो, तर समाजवादी पक्षही १०० हून अधिक जागांवर विजयी होईल, असा कल रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ४५ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ३५ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. या मतांचे जागांमध्ये रूपांतर केले असता उत्तर प्रदेशात भाजपाला २६२ ते २७७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ११९ ते १३४ जागा मिळण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षाला ७ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ३ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे.  

टीव्ही ९ पोलस्ट्रेटच्या एक्झिट पोलनुसारही उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपाला २११ ते २२५, समाजवादी पक्षाला १४६ ते १६०, बसपाला १४ ते २४ आणि काँग्रेसला ४ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपचीच सत्ता कायम राहणारटाईम्स नाऊ-व्हिटोच्या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये भाजपला ४४ ते ५० जागा मिळू शकतात. काँग्रेसला १२ ते १५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला ५ ते ८ जागांवर यश मिळू शकतं. उत्तराखंडात विधानसभेच्या ७० जागा आहेत. 

इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, उत्तराखंडमध्ये भाजपला ३६ ते ४६ जागा मिळू शकतील. तर काँग्रेसला २० ते ३० जागांवर समाधान मानावं लागेल. न्यूज २४ चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ४३, काँग्रेसला २४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक पी मार्कच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ३६ ते ४२, तर काँग्रेसला २५ ते ३१ जागा मिळण्याची अंदाज वर्तवला गेला आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा