उत्तरप्रदेशमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये ओम, 786 आदी धार्मिक चिन्हे लिहिण्यास बंदी
By Admin | Updated: February 12, 2016 19:06 IST2016-02-12T19:06:59+5:302016-02-12T19:06:59+5:30
उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेवर ओम किंवा 786 किंवा अन्य धार्मिक चिन्हे, अक्षरे लिहू नयेत असे निर्देश उत्तर प्रदेशच्या

उत्तरप्रदेशमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये ओम, 786 आदी धार्मिक चिन्हे लिहिण्यास बंदी
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १२ - उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेवर ओम किंवा 786 किंवा अन्य धार्मिक चिन्हे, अक्षरे लिहू नयेत असे निर्देश उत्तर प्रदेशच्या माध्यमिक शिक्षा परिषदेने दिले आहेत. या निर्देशांचे पालन न केल्यास त्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देणार नाही असेही बजावण्यात आले आहे.
परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांचा धर्म उत्तरपत्रिका तपासणा-याला कळू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.
शिवाय विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी मोबाईल अथवा अन्य कुठलीही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे परीक्षा देताना जवळ बाळगू नयेत असे निर्देशही देण्यात आले आहेत.
परीक्षा देताना अथवा नंतरही विद्यार्थ्यांचं परीक्षाकेंद्रावरील निरीक्षकांशी योग्य वर्तन असावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. जर का कुठल्याही नियमांचा भंग विद्यार्थी करत असेल तर त्या विद्यार्थ्याला ती परीक्षा अथवा पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी अपात्र ठरवण्यात येईल असंही परिषदेने स्पष्टपणे बजावले आहे.
परीक्षा चांगल्या वातावरमात व्हाव्यात आणि निष्पक्ष व्हाव्यात यासाठी सदर नियमावली बनवण्यात आल्याचे शाळांचे जिल्हा निरीक्षक मोहम्मद इब्राहिम यांनी सांगितलं.