प्रचंड भयभीत झालाय आदित्य उर्फ अब्दुल, रात्रभर रडला; एटीएसच्या चौकशीत सांगितलं- ...म्हणून इस्लाम स्वीकारला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 02:18 PM2021-06-26T14:18:29+5:302021-06-26T14:22:04+5:30

Religious conversion case : आदित्य रात्री अचानक अस्वस्त झाला आणि आईला म्हणाला, आता आपण समाजात कसे राहणार? अन् नंतर थेट एटीएसच्या अधिकाऱ्यालाच मेसेज केला....

Uttar Pradesh religious conversion case aditya in panic | प्रचंड भयभीत झालाय आदित्य उर्फ अब्दुल, रात्रभर रडला; एटीएसच्या चौकशीत सांगितलं- ...म्हणून इस्लाम स्वीकारला 

प्रचंड भयभीत झालाय आदित्य उर्फ अब्दुल, रात्रभर रडला; एटीएसच्या चौकशीत सांगितलं- ...म्हणून इस्लाम स्वीकारला 

Next

नवी दिल्ली - धर्मांतरण करून इस्लाम स्वीकारलेला आदित्य उर्फ अब्दुल आता प्रचंड भयभीत झाला आहे. तो बुधवारी रात्रभर रडत होता. त्याला वाटत आहे, की त्याने जे काही केले, त्याने त्याचा अपमाण झाला आहे. आता तो येथे कसा राहू शकेल? तो अगदी मरण्याच्या गोष्टीही करत होता. यानंतर, त्याने एटीएसच्या एका अधिकाऱ्याला मेसेज केला. यावर, संबंधित अधिकाऱ्यानेही त्याला बराच वेळ व्हॉट्सअॅप चॅट करून समजावले, तेव्हा तो शांत झाला. (Uttar Pradesh religious conversion case aditya in panic)

एटीएसच्या टीमने बुधवारी काही तास आदित्यला समजावले होते आणि त्याला सांगितले होते, की धर्मांतरण करणारे लोक देश विरोधी आहेत. ते दुर्बल, असहाय्य आणि मूकबधीर लोकांचा वापर करतात. तेव्हा आदित्य त्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार होत नव्हता. मात्र, तो रात्री अचानक अस्वस्त झाला आणि आई लक्ष्मी यांना म्हणाला, आता आपण समाजात कसे राहणार? यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बराच वेळ समजावले, तेव्हा तो थोडा शांत झाला.

Conversion Case: मूकबधिरांना मुस्लीम करून बनवायचं होतं दहशतवादी; झाले 'असे' खुलासे, की अधिकारीही हैराण

सर, आपण आमची मदद करू शकता?
लक्ष्मी यांनी सांगितले, की आदित्यने गुरुवार सकाळी एका एटीएस अधिकाऱ्याला मेसेजकरून मदत मागितली. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. तेव्हा आदित्य म्हणाला, आपले आयुष्य उध्वस्त झाले आहे, असे आपल्याला वाटत आहे. यावर अधिकारी म्हणाले, आदित्य तू खूप हुशार आहेस. म्हणूनच तर 12वी पर्यंतच्या परीक्षा पास केल्या आहेत. तू भ्रमित झाला होतास. यामुळे काही दिवस तुझे मन इकडे-तिकडे भटकले होते. आता आम्ही सर्व जण तुझ्यासोबत आहोत. कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आदित्यला थोडा दिलासा मिळाला.

इच्छा पूर्ण करण्यासाठी बदलला धर्म -
आदित्य म्हणाला, मला असे वाटत होते, की आपले घर असावे. आपल्याला नोकरी लागावी आणि सामान्य जीवन जगता यावे. आधी तो मंदिरांमध्ये गेला. नंतर चर्चमध्ये गेला. मात्र, या दोन्ही ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. तेव्हा एका व्यक्तीने त्याला इस्लामप्रती प्रेरित केले आणि त्याने आपला धर्म बदलला.

‘आदित्य’चा बनला अब्दुल! हिंदू धर्माकडून त्याला हवीत ‘या’ ७ प्रश्नांची उत्तरं; आईवडिलांसमोर धर्मसंकट

आदित्य म्हणाला, मला वाटले इस्लाम स्वीकारला, की सर्व काही मिळेल. म्हणून आपण असे केले. पण, तसे काहीच झाले नाही. खरे तर गुरुवारी एटीएसने त्याची काउंसिलिंग केली, तेव्हा ते हळू-हळू सर्व काही समजू लागला होता. काही काळानंतर तो पुन्हा सामान्य होईल, अशी शक्यता आहे. 

Web Title: Uttar Pradesh religious conversion case aditya in panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.