शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न अन् गुंडांबरोबरच्या चकमकीत पोलीस शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 09:01 IST

उत्तर प्रदेशमधल्या अमरोहामध्ये गुंडांबरोबरच्या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाला आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधल्या अमरोहामध्ये गुंडांबरोबरच्या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाला बछरायू भागातल्या इंद्रपूर गावामध्ये ही घटना घडली आहे.शहीद झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव हर्ष चौधरी आहे.

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या अमरोहामध्ये गुंडांबरोबरच्या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाला आहे. बछरायू भागातल्या इंद्रपूर गावामध्ये ही घटना घडली आहे. शहीद झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव हर्ष चौधरी आहे. पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या भागाला चारही बाजूंनी घेराबंदी करण्यात आली असून, पोलिसांनी गुंडांची धरपकड सुरू केली आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात हर्ष चौधरी शहीद झाले.गोळीबारात जखमी झालेल्या हर्ष चौधरी यांना तात्काळ मुरादाबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच पोलीस कॉन्स्टेबल हर्ष चौधरी यांचं लग्न झालं होतं. पोलिसांनी या चकमकीतला म्होरक्या शिव अवतार ऊर्फ शिविया याचा खात्मा केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या गुंडांविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. नेहमीसारखीच तपासणी करत असताना पोलिसांनी या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवियानं पोलिसांवरच गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही उत्तरादाखल त्या गुंडांवर गोळीबार केला. शहीद हर्ष चौधरी हे 2016मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांत भरती झाले होते.सहा महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांची बदली अमरोहातल्या बछरायू पोलीस स्टेशनमध्ये झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर अतीव दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी शहीद हर्ष चौधरीच्या पत्नीला 40 लाख रुपये देण्यासह हर्षच्या आई-वडिलांना 10 लाखांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच हर्ष चौधरीच्या पत्नीला पोलिसांकडून पेन्शनही देण्यात येणार आहे. तसेच परिवारातील एका व्यक्तीला पोलिसांत नोकरी मिळणार आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश