शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

कँडल मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, वरुण गांधींची आपल्या पक्षावर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 12:38 IST

लखनऊमध्ये कँडल मार्च काढून शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली:उत्तर प्रदेशमध्ये 69 हजार सहाय्यक शिक्षकांच्या भरतीचे प्रकरण जोर धरत आहे. अनियमिततेचा आरोप करत उमेदवार सातत्याने आंदोलन करत आहेत. दरम्यान, लखनऊमध्ये कँडल मार्च काढणाऱ्या उमेदवारांवर पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर राजकीय वर्तुळात याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. रविवारी भाजप खासदार वरुण गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. विरोधकही या प्रकरणावरुन भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत.

भाजप खासदार वरुण गांधी लाठीचार्जचा व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले की, 'ही तुमची मुलं असती तर त्यांनाही अशीच वागणूक दिली असती का?ही मुले भारतमातेचे लाल आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवणे तर दूरच, कोणीही त्यांच म्हणणं ऐकायला तयार नाही. त्यातच त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला गेला. मनावर हात ठेवून विचार करा की ही तुमची मुलं असती तर त्यांनाही अशीच वागणूक मिळाली असती का?' असा सवाल त्यांनी विचारला आहे.

विरोधी पक्षांनी सरकारला घेरले

काही दिवसांपूर्वीच UPTET भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये यूपी पोलिसांनी 26 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणावरुन काँग्रेस, समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले- 'यूपी सरकारने रोजगार शोधणाऱ्यांवर लाठीमार केला. भाजप मते मागायला आल्यावर हे लक्षात ठेवा!' यासोबतच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनीही यूपी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशVarun Gandhiवरूण गांधीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा