शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

लखनौ : रिफिलिंगदरम्यान ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, पाच गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 18:48 IST

मिळालेल्या माहितीनुसार, चिनहट येथील केटी वेल्डिंग स्टोर ऑक्सिजन प्लांटमध्ये दुपारी 3 वाजताच्या सुमारास जम्बो सिलेंडरमध्ये रिफिलिंग करताना भीषण स्फोट झाला.

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे मोठी घटना घडली आहे. येथे रिफिलिंगदरम्यान ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने तिघांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाल्याचे समजते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. हा अपघात चिनहटच्या केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये घडला. (Uttar Pradesh Lucknow blast at oxygen refiling plant 3 diedd 5 injured)

मिळालेल्या माहितीनुसार, चिनहट येथील केटी वेल्डिंग स्टोर ऑक्सिजन प्लांटमध्ये दुपारी 3 वाजताच्या सुमारास जम्बो सिलेंडरमध्ये रिफिलिंग करताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात प्लांटमध्ये असलेल्या तिघांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डीके ठाकूर आणि जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून चौकशीचे आदेश दिले आहेत. 

अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही, जरा मुंबईकडून शिका... SC नं केंद्राला फटकारलं

प्लांटचं छतही उडालं -हा स्फोट एवढा भयंकर होता, की प्लांटचे छतही उडाले. अद्यात मृत आणि जखमी कोण, यासंदर्भात माहिती मिळालेली नाही. डीएम यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मृत व्यक्ती आणि जमी प्लांटमध्ये  काम करणारे कामगारच आहेत. तर पोलीस काही बाहेरील लोकांसंदर्भातही शंका व्यक्त करत आहेत. फॉरेंसिक टीम आणि डॉग स्क्वॅड प्लांटमध्ये पोहोचून स्फोटाचा तपास करत आहेत.

यापूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरच्या पनकी ऑक्सिजन प्लांटमध्ये रिफिलिंगदरम्यान स्फोट झाला होता. यात एका मजुराचा मृत्यू झाला होता, तर 2 जण जखमी झाले होते. दादा नगर औद्योगिक वसाहतीत असलेल्या या पनकी गॅस प्लांटमध्ये किदवई नगरातील एका रुग्णालयातील व्यक्ती गॅस भरण्यासाठी आला होता.

Covid-19 second wave: हार्ट अ‍ॅटॅकमुळे का होतोय कोरोना बाधितांचा मृत्यू? जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार

गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 नवे रुग्ण -गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे.  

 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनBlastस्फोटUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या