शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 15:53 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पुतणी मारिया आलम खान यांचं फर्रुखाबाद येथे दिलेलं भाषण मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मारिया आलम यांनी मुस्लिम समाजाला एकजुटीने मतदान करण्याचं आवाहन करताना सांगितलं की एकजुटीने मतांचा जिहाद करा, कारण आपण केवळ मतांचा जिहादच करू शकतो. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादम्यान नेतेमंडळींकडून मतदारांना संबोधित करत असताना वेगवेगळे दावे केले जात आहेत. तसेच मतदारांना वेगवेगळ्या माध्यमातून भावनिक आवाहनंही केली जात आहेत. सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पुतणी मारिया आलम खान यांचं फर्रुखाबाद येथे दिलेलं भाषण मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारसभेला संबोधित करताना मारिया आलम यांनी मुस्लिम समाजाला एकजुटीने मतदान करण्याचं आवाहन करताना सांगितलं की एकजुटीने मतांचा जिहाद करा,  कारण आपण केवळ मतांचा जिहादच करू शकतो. 

मारिया आलम खान पुढे म्हणाल्या की, खूप हुशारीने, अजिबात भावनिक न होता एकदम शांततेत एकत्रितपणे मतांचा जिहाद करा. कारण आपण केवळ मतांचा जिहाद करू शकतो. त्या माध्यमातून या संघी सरकारला हटवण्याचं काम करू शकतो. काही मुस्लिमांनी मुकेश राजपूत यांची सभा घेतली हे ऐकून मला लाज वाटली. अशा लोकांचं खानपान बंद केलं पाहिजे. 

मुस्लिमांना सल्ला देताना त्या पुढे म्हणाल्या की, एवढेही स्वार्थी बनू नका. मुलांच्या जीवनाशी खेळू नका. आज कितीतरी लोक सीएए-एनआरसीमधून तुरुंगात बंद आहेत. त्यामधील अनेकांचे खटले सलमान खुर्शिद साहेब मोफत लढत आहेत. 

लोक सांगताहेत की संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. पण मी सांगते की, मानवता धोक्यात आहे. आता मानवतेवर हल्ला होत आहे. जर तुम्हाला तुमच्या देशाला वाचवायचं असेल, आपल्या देशाचं सौंदर्य वाचवायचं असेल, गंगा जमनी तहजीब वाचवायची असेल तर यावेळी पूर्ण शुद्धीत राहून मत द्या. कुणाच्याही सांगण्यामध्ये अडकू नका. तुमचा समजूतदारपणाच आता आपल्या देशाला वाचवू शकेल.  

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४