शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: उत्तर प्रदेशात महाराष्ट्राच्या दहापट कोरोना रुग्ण; कुंभमेळ्यामुळे 17 दिवसांत रुग्ण 551 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 04:33 IST

Coronavirus महाराष्ट्र कदाचित रुग्णसंख्येत राज्यांत पुढे असेल. परंतु, रुग्णवाढीचा मुद्दा येतो तेव्हा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडने आघाडी घेतली आहे.

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असल्याची चर्चा असली तरी, प्रत्यक्षात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड रुग्णसंख्येबाबत फार मोठ्या आघाडीवर आहेत. 

महाराष्ट्र कदाचित रुग्णसंख्येत राज्यांत पुढे असेल. परंतु, रुग्णवाढीचा मुद्दा येतो तेव्हा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडने आघाडी घेतली आहे. वस्तुस्थिती अशी की, टक्केवारीचा विचार केला तर महाराष्ट्राने या दोन राज्यांच्या तुलनेत चांगले काम केले आहे. संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार एक एप्रिल रोजी महाराष्ट्रात ४३,१८३ रुग्ण होते ते १७ एप्रिल रोजी ६७,१२३ झाले. १७ दिवसांत महाराष्ट्रात रुग्णांत १५५ टक्के वाढ झाली. परंतु, हीच वाढ उत्तर प्रदेशमध्ये १,०५५ टक्के (महाराष्ट्राच्या सात पट) होती. उत्तर प्रदेशमध्ये एक एप्रिल रोजी २५८९ रुग्ण होते ती संख्या १७ एप्रिल रोजी २७३३४ झाली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे, कुंभमेळ्याने फैलाव केला नाही असा दावा कदाचित करतीलही. परंतु, आकडेवारी या दाव्याला दुजोरा देत नाही. उत्तराखंडमध्ये एक एप्रिल रोजी ५०० रुग्ण होते. परंतु, १७ एप्रिल रोजी ती संख्या २७५७ झाली. म्हणजे १७ दिवसांत ५५१ टक्के वाढ. ही वाढ महाराष्ट्रात झालेल्या १५५ टक्के वाढीच्या किती तरी जास्त आहे.  कोरोना रुग्णवाढीची राष्ट्रीय सरासरी ही निराश करणारी आहे. कारण एक एप्रिल रोजी ८१,३९८ रुग्ण होते ते १७ एप्रिलला २,६०,८९५ झाले. ही वाढ ३२० टक्क्यांची आहे.

‘लसीकरण झाले तरीही भारतात प्रवास टाळा’वाॅशिंग्टन/नवी दिल्ली : भारतात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत दरराेज अडीच लाखांहून नवे रुग्ण आढळत आहेत. काेराेनाच्या उद्रेकामुळे भारतात प्रवास करू नये तसेच ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशांनीही भारतात जाणे टाळण्याचा सावधगिरीचा इशारा अमेरिकेच्या राेग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने अमेरिकन नागरिकांना दिला आहे. भारतात काेराेनाच्या विषाणूचे डबल म्युटेशन आढळून आले आहे. हा विषाणू अतिशय वेगाने पसरताे. त्यामुळे भारतात काेराेनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी भारतात जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. ‘सीडीसी’ने म्हटले आहे, की पूर्ण लसीकरण झाले तरीही संसर्ग तसेच विषाणूचा प्रसार होण्याचा धाेका आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKumbh Melaकुंभ मेळा