उत्तर प्रदेशात विषारी दारूचे १४ बळी
By Admin | Updated: January 13, 2015 00:20 IST2015-01-13T00:20:40+5:302015-01-13T00:20:40+5:30
उत्तर प्रदेशच्या लखनौ आणि उन्नाव जिल्ह्णांमध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ जण मृत्युमुखी तर शंभरावर लोक आजारी पडले आहेत.

उत्तर प्रदेशात विषारी दारूचे १४ बळी
लखनौ/ उन्नाव : उत्तर प्रदेशच्या लखनौ आणि उन्नाव जिल्ह्णांमध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ जण मृत्युमुखी तर शंभरावर लोक आजारी पडले आहेत. त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.
मृतांमध्ये लखनौ जिल्ह्यातील आठ तर उन्नाव जिल्ह्यातील चौघे असून लखनौच्या महिलाबाद भागातील खडता आणि लगतच्या गावांमध्ये तसेच उन्नाव जिल्ह्याच्या हसनगंज भागातील तलासराई या गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा तपास वाराणशीच्या संयुक्त अबकारी आयुक्तांकडे सोपविण्यात आल्याचे अबकारी आयुक्तांनी सांगितले. (वृत्तसंस्था)