शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

निकाहावेळी नवरदेव मुस्लीम नसून हिंदू असल्याचं समजताच उडाला गोंधळ, मौलवीला आली शंका; मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 15:49 IST

सोशल मिडियावर दोघांची मैत्री... दोन वर्षांपासून सुरू होते बोलणे... या काळात दोघे आणखी जवळ आले अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले...

ठळक मुद्देसोशल मिडियावर झाली दोघांची मैत्री.सोशल मिडियावरील मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात.निकाह वाचताना मौलवीला आली शंका.

महाराजगंज - उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका निकाहादरम्यान मौलवीला नवरदेवाची शंकाल आली. यानंतर नवरदेवाचे खिसे तपासण्यात आले. त्यात पॅन कार्ड मिळाले. या पॅन कार्डवरून नवरदेव मुस्लीम नसून हिंदू असल्याचे समोर आले आणि एकच गोंधळ उडाला. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी संबंधित नवरदेवाला जबरदस्त मारहाण केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. 

सोशल मिडियावर झाली होती ओळख -ही घटना कोल्हुई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गावातील संबंधित मुलीचे सिद्धार्थनगर येथील युवकाशी प्रेम प्रकरण सुरू होते. सोशल मिडियावरून या दोघांची मैत्री झाली होती. या दोघांत जवळपास दोन वर्षांपासून बोलणे होत होते. या काळात दोघे आणखी जवळ आले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले.

निकाह वाचताना मौलवीला आली शंका -यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी लग्नाला परवानगी देत वरात आणण्यास सांगितले. यावर, तरुणाने कोरोना महामारीचा हवाला देत दो-चार लोकांनाच वरातीत आणण्यासंदर्भात सांगितले. यावर तरूण रविवारी निकाहासाठी पोहोचला. मौलवींनी निकाह वाचायला सुरुवातही केली. याच वेळी उर्दूचे काही शब्द बोलताना तरूण गडबडला. यानंतर मौलवीला त्याची शंका आली. यावर नवरदेव तरुणाची झडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात पॅनकार्ड सापडले. यावरूनच मुलगा मुस्लीम नसल्याचे समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतर तेथे प्रचंड गोंधळ उडाला आणि तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी नवरदेवाला जबर मारहाण केली आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. 

Love Story : 10वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहोचला स्वित्झर्लंडला! फिल्मी आहे संपूर्ण स्टोरी

नवरदेवाची चौकशी -यासंदर्भात बोलताना पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दिलीप शुक्ला म्हणाले, नवरदेवासह वरतीतील लोकांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली जात आहे. दोन्ही पक्षांची बोलणी सुरू आहे. मुलगा मुस्लीम नसल्याचे मुलीला आधीच माहीत होते. निकाह करवणाऱ्या मोलवीला यासंदर्भात माहिती नव्हती. यामुळे गोंधळ उडाला. पीडित पक्षाने तक्रार दिल्यास गुन्हा नोंदवून कारवाई केली जाईल.

टॅग्स :marriageलग्नMuslimमुस्लीमHinduहिंदूUttar Pradeshउत्तर प्रदेश