शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Robbery: 70 लाखांच्या दागिने चोरी प्रकरणाला नाट्यमय वळण, पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 14:37 IST

PNB बँकेच्या लॉकरमधून 70 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी तपास केला. पण, तपासातर वेगळीच माहिती समोर आली.

गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील पीएनबी(PNB) बँकेच्या लॉकरमून चोरीला गेलेले 70 लाख रुपयांचे दागिने अखेर सापडले आहेत. नेहरु नगर येथील PNB बँकेत झालेल्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणात एक अतिशय नाट्यमय बाब समोर आली आहे. बँकेतून 70 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेलेच नाही, अशी माहिती समोर आली आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?3 मार्च रोजी गाझियाबादच्या अशोक नगर भागात राहणाऱ्या प्रियंका गुप्ता नावाच्या महिलेचे नेहरू नगर भागातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेल्या 20 वर्षांपासून खाते आहे. प्रियंका गुप्ताने आपले सर्व 70 लाख रुपयांचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. 2019 मध्ये तिने शेवटचे लॉकर वापरले होते. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्येच लॉकर उघडण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. पण तिला लॉकरची चावी सापडली नसल्याने ते उघडता आले नाही.

असा झाला खुलासा...अखेर पोलिसांच्या मदतीने लॉकर तोडण्यात आले, पण लॉकरमध्ये दागिने नव्हते. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान समजले की, महिलेने जे लॉकर तोडायला सांगितले, ते तिचे नव्हतेच. नंतर तिचे लॉकर तोडण्यात आले, त्यात महिलेचे सर्व 70 लाखांचे दागिने सुखरुप असल्याचे समजले. या प्रकरानंतर गाझियाबाद पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRobberyचोरीjewelleryदागिनेPoliceपोलिस