शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश यादवांना आणखी एक झटका, झेड प्लस सुरक्षा काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 10:32 IST

याआधी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी करण्यात आली होती.

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याचा सरकार विचार करत आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या सुरक्षेतेसाठी असलेला ब्लॅक कॅट कमांडोचा ताफा कमी होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी झाली आहे. तसेच, एनएसजीला यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुलायम सिंह यादव आणि मायावती यांच्या सुरक्षेतेसाठी एनएसजी तैनात आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर आता अखिलेश यादव यांची सुरक्षा कमी करण्यात येत आहे. त्यामुळे एकप्रकारे अखिलेश यादव यांना दुसरा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यातील आघाडी तुटली. तर, या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने 10 आणि समाजवादी पार्टीने फक्त 5 जागांवर मिळविला आहे.

याआधी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. चंद्राबाबू नायडू यांना 2003 मध्ये तिरुपती येथील अलिपिरीमध्ये नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून चंद्राबाबू नायडू यांनी झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती.

चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षनेते...आंध्र प्रदेशात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीचा दारूण पराभव झाला. त्या पक्षाचे केवळ २३ उमेदवारच विधानसभेवर निवडून आले आहेत. चंद्राबाबू नायडू राज्यातील विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. तेलगू देसम आमदारांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडून आलेले आमदार आणि पक्षाचे तीन खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करण्यात आला. त्यानंतर,  चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाचा नेता म्हणून खासदार गल्ला जयदेव यांची नेमणूक केली. लोकसभेतील नेता म्हणून के. राजमोहन नायडू, तर राज्यसभेतील नेता म्हणून के. सत्यनारायण चौधरी यांचीही त्यांनी नियुक्ती केली. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेश