शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

Fire In Passenger Train: सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला भीषण आग, इंजिनसह दोन डबे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 09:48 IST

प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन दौराला स्‍टेशनवर पोहोचली तेव्हा तिच्या इंजिनच्या खालच्या बाजूला आग लागली. यानंतर, ट्रेनमधील प्रवाशांना धूर आणि ठिणग्या निघताना दिसल्या आणि ते आरडा-ओरड करत ट्रेनमधून बाहेर पडत प्लॅटफॉर्मवर धावले.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला शनिवारी सकाळी मेरठमधील दौराला स्टेशनवर भीषण आग लागली. ट्रेनचा ब्रेक जाम झाल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते. या अपघातात रेल्वेच्या इंजिनसह दोन डबे जळून खाक झाल्याचे समजते.

प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन दौराला स्‍टेशनवर पोहोचली तेव्हा तिच्या इंजिनच्या खालच्या बाजूला आग लागली. यानंतर, ट्रेनमधील प्रवाशांना धूर आणि ठिणग्या निघताना दिसल्या आणि ते आरडा-ओरड करत ट्रेनमधून बाहेर पडत प्लॅटफॉर्मवर धावले. यानंतर त्यांनी ट्रेनमधील इतर प्रवाशांना आणि चालकालाही सावध केले. ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच यावेळी अनेक लोकांनी मागच्या डब्यात बसलेल्या प्रवाशांनाही घटनेची माहिती देत सावध केले.यानंतर, बघता-बघता ट्रेनमध्ये लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. आग डब्ब्यांमध्येही पसरली. रेल्वे प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत इंजिनसह दोन्ही डब्यांत ही आग पूर्णपणे पसरली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण ही आग एवढी भीषण होती, की काही वेळातच दोन्ही डबे जळून खाक झाले. दरम्यान, काही प्रवाशांच्या मदतीने ट्रेनचे हे डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले.देवबंदपासूनच येत होता आवाज -ट्रेनमधून उतरत स्वतःचा जीव वाचवलेल्या प्रवाशांनी सांगितल्यानुसार, त्यांना देवबंदपासूनच काही आवाज आणि वासही येत होते. मात्र, याचे कारण कुणालाही समजत नव्हते. नंतर, अचानकपणे सीटखालून धूर निघू लागला. धूर अधिक वाढल्यानंतर, प्रवाशांची धावपळ उडाली आणि दौराला स्‍टेशनवर गाडी थांबताच प्रवासी आरडा-ओरड करत गाडीतून बाहेर पडले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीrailwayरेल्वेpassengerप्रवासी