शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश पोटनिवडणूक : गोरखपूर-फुलपूरमध्ये मतदानाला सुरूवात, आदित्यनाथांनी केलं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 08:30 IST

गोरखपूरची निवडणूक भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने गोरखपूर येथील जागा रिकामी झाली आहे.

लखनऊ:  उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधील अररिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विकास आणि गुड गव्हर्नन्ससाठी भाजपाची गरज आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे मतदान केल्यानंतर म्हटले. त्यापूर्वी सकाळी 5 वाजता ते गोरखनाथ मंदिरात पोहोचले होते. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणच्या जागा भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत. मात्र त्यातही गोरखपूरची निवडणूक भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे.या निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, निमलष्करी दलाचे साडेसहा हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. गोरखपूरमध्ये १०, तर फुलपूरमध्ये २२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी १४ रोजी होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने गोरखपूर येथील जागा रिकामी झाली आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने फुलपूरची जागा रिकामी झाली आहे. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उपेंद्र दत्त शुक्ला आणि फुलपूर मधून कौशलेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून, काँग्रेस स्वबळावर लढत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथElectionनिवडणूक