शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Uttar Pradesh Election 2022: महाराष्ट्रातून यूपीत असंख्य कॉल्स; ‘मोदी की हवा अभी भी है क्या?’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 07:32 IST

झाशीपासून गोरखपूरपर्यंतच्या भागाने गेल्यावेळी भाजपला भरभरून मते दिलेली. त्यामुळे भाजपच्या बड्या नेत्यांची फौजच आता मैदानात उतरलीय.

सचिन जवळकोटे झाशी : उत्तर प्रदेशच्या निवडणुकांकडे बहुतांश राज्यांचे बारीक लक्ष. ही भूमी सांगते देशाच्या राजकारणाचा कल. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनाही इथल्या घडामोडींबद्दल प्रचंड उत्सुकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत ‘योगी सरकारही आयेगी,’ असे वारंवार बजावताहेत. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी भाजपसाठी समाधानकारक नव्हती. मुरादाबाद, बिजनौर, अमरोहा अन् सहारनपूर जिल्ह्यात अत्यंत चुरशीने मतदान झालेय. अपवाद वगळता पूर्वीपासूनच हा पट्टा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला.

इथल्या मतदानानंतर अखिलेश अधिकच आक्रमक झाल्याचे स्पष्टपणे जाणवू लागलेय. ‘भाजपच्या नेत्यांचे पडलेले चेहरेच सांगतात की यूपीचा निकाल काय लागणार, पहिल्या दोन टप्प्यात सपा शंभर पार,’ या भाषेत ते आता प्रचंड आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांशी बोलू लागलेत.भाजपसाठी मात्र पुढच्या टप्प्यातले मतदारसंघ अधिक विश्वासाचे. झाशीपासून गोरखपूरपर्यंतच्या भागाने गेल्यावेळी भाजपला भरभरून मते दिलेली. त्यामुळे भाजपच्या बड्या नेत्यांची फौजच आता मैदानात उतरलीय. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर थेट रस्त्यावर उतरून मतदारांशी संवाद साधताहेत.  मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील काही जिल्ह्यांमध्ये ‘यादव बेल्ट’ स्ट्राँग. त्यामुळे मागची पिछाडी भरून काढण्यासाठी भाजपला या ठिकाणी कडवा संघर्ष करावा लागतोय. 

मुंबईहून येताहेत सातत्याने कॉल्सबुधवारी झाशीत योगी यांच्या दौऱ्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणचे पत्रकार जमलेले. बोलता-बोलता काही जणांनी सांगितले, ‘आम्हाला तुमच्यामहाराष्ट्रातून सतत कॉल्स येताहेत.  बहुतांश करून मुंबईचेच असतात. तुमच्याकडच्या नेत्यांना यूपीच्या राजकारणात भलताच इंटरेस्ट दिसतोय.’ विशेष म्हणजे तिकडून कॉल करणाऱ्यांचा एक प्रश्न म्हणे हमखास ठरलेला असतो, ‘मोदीं की हवा कुछ कम हुई क्या नहीं ?

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा