शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Uttar Pradesh Election 2022: मते फोडण्यासाठी भाजपची ‘यादव’ रणनीती; मोदी-योगींच्या तोंडी एकच नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 12:43 IST

इटावा, मैनपुरी, फिरोजाबाद, कासगंज, औरेय्या अन् एटा या सहा जिल्ह्यात गेली दोन ते अडीच दशके मुलायमासिंहांना घवघवीत यश मिळाले.

सचिन जवळकोटे करहल : योगी अन् मोदी यांच्या तोंडी सध्या एकच नाव. ते म्हणजे यादव परिवार. उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्यात यादव समाज लाखोंच्या घरात. त्यामुळे हा ‘यादव बेल्ट’ डळमळीत करण्यासाठी भाजपने आखलीय 'यादवी' घडवण्याची रणनीती.

इटावा, मैनपुरी, फिरोजाबाद, कासगंज, औरेय्या अन् एटा या सहा जिल्ह्यात गेली दोन ते अडीच दशके मुलायमासिंहांना घवघवीत यश मिळाले. मात्र २०१७ निवडणुकीत पिता-पुत्राच्या वादात यादव विभागले गेले. त्याचा फायदा भाजपलाच झाला. मात्र यंदा पिता-पुत्रासोबतच 'चाचा-भतिजा'ही एक झालेत. जसवंतनगरचे आमदार काका शिवपाल सिंहही आता अखिलेश यांच्यासोबत आहेत. केंद्रीय कायदा राज्यमंत्री एसपीसिंह बघेल यांना अखिलेशच्या विरोधात उतरवले आहे. ते एकेकाळी मुलायमसिंह यांचे स्वीय सुरक्षा अधिकारी होते. सपाचे खासदारही होते. शाक्य, बघेल आणि इतर मागासवर्गीय समाजाचा बघेल यांना फायदा होईल, असा भाजप नेत्यांना अंदाज आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारच दिलेला नाही.

अखिलेश यांच्या वहिनी अपर्णा यादव यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मुलायमसिंह यांच्या घराण्यात फाटाफूट घडविण्याचा अर्थात यादवी माजवण्याचा प्रयत्न योगी आदित्यनाथांनी केला आहे. ‘अपर्णा यांच्यामागे किती कार्यकर्ते असतील ?’ या प्रश्नावर रोहनसिंह यादव नामक कार्यकर्ता उत्तरला, 'बात सिर्फ ताकत की नही, लोगो मे संभ्रम फैलाने की है.'

...लेकिन आखीर यादवही हैअखिलेश यांच्या करहल मतदारसंघात सर्वाधिक संख्या यादवांची असली तरीही दोन गोत्रांमध्ये हा समाज विभागला आहे. अखिलेश कमरिया यादव आहेत. मात्र इथे घोसी यादव सर्वाधिक. त्यामुळे भाजपने घोसींवरही अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मात्र एक कार्यकर्ता स्वरूपसिंह यादव म्हणतात, 'नेताजी का बेटा कोई भी हो, लेकिन आखीर यादवही है.'

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादव