उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 12:34 PM2020-02-29T12:34:02+5:302020-02-29T12:34:16+5:30

गुन्हे अन्वेशन विभाग आणि विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) तसेच लोकल पोलिसांना या संदर्भात आधीच सूचना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नुकसानीची माहिती घेण्यासाठी नगर विकास अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही मिळाल्याचे समजते.

Like Uttar Pradesh, Delhi Police will also collect compensation from the accused of violence | उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई

उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर दिल्ली पोलिसांनी देखील उत्तर-पूर्व दिल्लीतील धार्मिक हिंसेदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई हिंसा करणाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या हिंसेत वैयक्तीक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या योजनेत काम करणाऱ्या पोलिसांनी नाव न छापण्याची अटीवर ही माहिती दिली आहे.

गुन्हे अन्वेशन विभाग आणि विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) तसेच लोकल पोलिसांना या संदर्भात आधीच सूचना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नुकसानीची माहिती घेण्यासाठी नगर विकास अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही मिळाल्याचे समजते.

उत्तर-पूर्व दिल्लीत मागील चार दिवसांत संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचे काम एसआयटीकडे सोपविण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यासह अनेक स्थानिक गुन्हेगारांनी जाफराबाद, कर्दमपुरी, करावल नगर, मौजपूर, भजनपूर आणि अन्य भागांतील हिंसक घटनांचा फायदा घेतला आहे.

दरम्यान दिल्ली पोलिसांना आतापर्यंत हिंसा घडविणाऱ्यांची एक हजार जणांची ओळख पटली आहे. यापैकी 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हिंसेत झालेल्या नुकसानीचं आकलन करण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र रविवार ते बुधवार या कालावधीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिल्ली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 


 

Web Title: Like Uttar Pradesh, Delhi Police will also collect compensation from the accused of violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.