शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
3
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
4
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
5
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
6
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
7
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
8
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
9
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
10
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
11
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
12
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
13
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
14
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
15
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
16
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
17
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
18
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
20
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?

जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 15:59 IST

Uttar Pradesh Crime News: जिम ट्रेनरने जिममध्ये येणाऱ्या एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ‘दृश्यम’ स्टाईलने थेट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या निवासस्थानाच्या परिसरात लपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. मृत महिला ही कानपूरमधील एका प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे.

जिम ट्रेनरने जिममध्ये येणाऱ्या एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ‘दृश्यम’ स्टाईलने थेट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या निवासस्थानाच्या परिसरात लपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. मृत महिला ही कानपूरमधील एका प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सदर महिलेचा मृतदेह हा डीएमचं निवासस्थान असलेल्या परिसरात नाही तर बाजूच्या क्लबमध्ये मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच शहरातील सर्व जिम आणि जिम ट्रेनरचं पोलिस व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कानपूरमधील व्यावसायिक राहुल गुप्ता यांची पत्नी एकता ही  रोज सकाळी ग्रीन पार्क परिसरातील जिममध्ये जायची २४ जून रोजीही ती सकाळी साडे पाचच्या सुमारासा जीममध्ये जाण्यासाठी निघाली. मात्र ती घरी परतलीच नाही. त्यानंतर पती राहुल गुप्ता यांनी जिम ट्रेनरविरोधात पोलिसांकडे एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. तसेच जिम ट्रेनर विमल सोनी याच्याही मागावर पोलीस होते. अखेरीत त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर विमल याने एकता गुप्ता या महिलेची हत्या केल्याचे कबूल केले.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी विमल सोनी आणि मृत एकता गुप्ता यांच्यामध्ये वर्षभरापासून अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. तसेच आरोपीचं अन्यत्र लग्न ठरल्यावर एकताने त्याच्याबरोबर वाद घातला. हा वाद एवढा वाढला की, त्या दरम्यान, आरोपीने एकता हिच्यावर एक ठोसा लगावला. त्यातच या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह डीएमच्या निवासस्थानाजवळच्या परिसरात पुरला. मात्र मृत महिलेच्या पतीने त्याच्या पत्नीचे कुणासोबतही कुठलेही संबंध नव्हते, असं सांगत पोलिसांचा दावा फेटाळून लावला आहे.  

दरम्यान, हत्या केल्यानंतर मृतदेह लपवण्याची कल्पना आरोपी विमल याला दृश्यम चित्रपटामधून सूचल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार तो करत होता. तेव्हा त्याला सिंघम चित्रपटात अजय देवगन पोलीस ठाण्यामध्ये मृतदेह कसा लपवतो ते आढवले. त्यानंतर आरोपीचं येणं जाणं असलेल्यी डीएम निवासस्थाना जवळच्या कंपाऊंडमध्ये त्याने या महिलेचा मृतदेह पुरला.   दरम्यान, पोलिसांनी विमल याला पकडल्यानंतर सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल  करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा कबूल केल्यानंतरही त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निवडलेल्या ठिकाणाबाबत चुकीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर मात्र त्याने मृतदेहाबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश