शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत विवस्त्रावस्थेत मिळाला तरुणीचा मृतदेह, कुटुंबीयांनी केला बलात्कार आणि हत्येचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 21:58 IST

Uttar Pradesh Crime News: अयोध्येमधील एका गावामध्ये २२ वर्षीय दलित तरुणीचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही तरुणी शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. आज सकाळी तिचा मृतदेह गावाबाहेर एका नाल्याजवळ सापडला. या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.  

अयोध्येमधील एका गावामध्ये २२ वर्षीय दलित तरुणीचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही तरुणी शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. आज सकाळी तिचा मृतदेह गावाबाहेर एका नाल्याजवळ सापडला. या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.  या तरुणीच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र पोलिसांनी कुठलाही तपास केला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. सकाळी शेतामध्ये रक्ताने माखलेले कपडे सापडले तेव्हा त्यांच्या मनात असलेली शंका खरी ठरली. त्यानंतर गावाबाहेरील नाल्याजवळ या तरुणीचा मृतदेह सापडला.  

मृत तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, आमच्या मुलीचे कपडे शेतात पडले आहेत, याची माहिती आम्हाला सुमारे १२ वाजण्याच्यादरम्यान मिळाली. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्ही त्यांची ओखळ पटवली. त्यादरम्यान, शाळेमध्येही रक्त पडलेलं असल्याची माहिती कुणीतरी दिली. तेव्हा आमच्या मुलीचा कुणीतरी खून केल्याची आमची खात्री पटली. आम्हाला पोलिसांकडून न्याय हवा आहे. ज्याने कुणी हा गुन्हा केला आहे तो लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे.

पोलीस अधिकारी सीईओ आशुतोष तिवारी यांनी या घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. आम्ही शोधमोहीम हाती घेतली आणि त्यात एक मृतदेह सापडला. हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आता शवविच्छेदनाच्या अहवालाच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येईल.

दुसरीकडे नातेवाईकांनी सांगितले की, पोलिसांनी आतापर्यंत केवळ आश्वासनच दिलं आहे. मात्र कुठलंही सक्त पाऊल उचललेलं नाही. या घटनेवरून गावात संतापाचं वातावरण आहे. तसेच ग्रामस्थांकडून न्यायाची मागणी केली जात आहे. तसेच पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश