शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या निवडणूक जिंकून देणाऱ्या फॉर्म्युल्यानं CM योगींची प्रचाराला सुरुवात, अखिलेश यादव यांचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 13:30 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी भाजपच्या वतीने प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी विकास आणि राष्ट्रवादासह माफियांच्या दुर्दशेवरही  भाष्य केले.

उत्तर प्रदेशात महानगर पालिकांच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. या निवडणुकीतही भाजप कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधकांना घेरत आहे. नुकत्याच मारल्या गेलेल्या अतिक अहमदवरील कारवाई संदर्भातील अजेंड्याला धार देण्यात भाजप गुंतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी भाजपच्या वतीने प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी विकास आणि राष्ट्रवादासह माफियांच्या दुर्दशेवरही  भाष्य केले.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राजकीय विश्लेषक प्रसून पांडे म्हणाले, निवडणुकीत मुद्दे कशा पद्धतीने मांडायला हवे, हे भाजपला चांगल्या प्रकारे माहित आहे. लोकसभा निवडणूक असो, की विधानसभा निवडणूक, भाजपने कायदा आणि सुव्यवस्था हा महत्त्वाचा मुद्दा बनवून सत्ता उलथवली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही प्रचाराचा प्रचंड अनुभव आहे. यामुळे त्यांना विरोधकांना चोख प्रत्युत्तर कसे द्यायचे हे माहीत आहे. एवढेच नाही, तर पश्चिम यूपीमध्ये प्रचाराला सुरू करताना माफिया मुख्तार आणि अतिकच्या गुंडांवर कारवाईमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचे योग्य प्रकारे भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पांडे यांनी म्हटले आहे.

माफियांवर दोन अश्रू ढाळणारेही उरलेले नाहीत - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात, "नो कर्फ्यू नो दंगा, यूपी में सब चंगा" असे म्हणत, राज्यातील बळकट कायदा आणि सुव्यवस्थेकडे जनतेचे लक्ष आकर्षित केले होते. ते म्हणाले आता उत्तर प्रदेशात माफियांवर दोन अश्रू ढाळणारेही उरलेले नाहीत. उत्तर प्रदेशात माफियांचा ढोल वाचून त्यांना रसातळाला नेण्याचे काम करण्यात आले आहे. याच बरोबर, "आता उपद्रव नव्हे, तर उत्सव आमची ओळख आहे आणि माफिया नव्हे, तर मोहोत्सव आमची ओळख आहे, असेही योगी म्हणाले. गेल्या सरकारवर आरोप करताना योगी म्हणाले, "2017 पूर्वीच्या सरकारला दंगली घडवण्यापासून वेळच मिळत नव्हता. मात्र आता, उत्तर प्रदेशात कुठेही कर्फ्यू नाही. आता तर कावड यात्राही सुरू झाली आहे. यापूर्वी तरूणांवर खोट्या केसेस केल्या जात होत्या. पूर्वी मुलींनाही घरातून बाहेर पडायची भीती वाटायची. मात्र आता उत्तर प्रदेशात भयमुक्त झाला आहे.'' 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण