शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात अवतरली बुलेट ट्रेन, ताशी 409 किमी वेगाने धावली रेल्वे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 15:40 IST

वेगवान ट्रेनमध्ये बसून काही तासांमध्ये दोन राज्यांमधले अंतर काटायचे हे भारतीयांचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे सध्या तरी दिसत नाही. मात्र उत्तर प्रदेशात मात्र सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या रेल्वेलाच बुलेटच्या वेगाने चालवून तिचीच बुलेट ट्रेन करण्याचा प्रयत्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

नवी दिल्ली- अहमदाबाद ते मुंबई असा बुलेट ट्रेनचा कागदावर प्रस्ताव असला तरी तिला होणारा विरोध पाहाता भारतात बुलेट ट्रेन कधी येईल हे सांगता येत नाही. वेगवान ट्रेनमध्ये बसून काही तासांमध्ये दोन राज्यांमधले अंतर काटायचे हे भारतीयांचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे सध्या तरी दिसत नाही. मात्र उत्तर प्रदेशात मात्र सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या रेल्वेलाच बुलेटच्या वेगाने चालवून तिचीच बुलेट ट्रेन करण्याचा प्रयत्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.उत्तर प्रदेशात काही रेल्वे बुलेट ट्रेनच्या वेगाने धावल्याची नोंद करण्यात आली असून कॅगच्या तपासणीमध्ये ही सगळी कागदावरची धावाधाव समोर आली आहे, रेल्वेने ठेवलेल्या वेगाच्या नोंदीमध्ये प्रचंड प्रमाणात अफरातफर झाल्याचे दिसून आले. अलाहाबाद दुरांतो एक्सप्रेस, जयपूर-अलाहाबाद एक्सप्रेस, प्रयागराज एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांचे ऑडिट कॅगने केले. त्यामध्ये हा सर्व बेबनाव लक्षात आला आहे. 7 जुलै 2016 रोजी अलाहाबाग दुरांतो एक्सप्रेस फतेहपूर स्थानकावर सकाळी 5 वाजून 53 मिनिटांनी पोहोचली. आणि अलाहाबादमध्ये सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी. म्हणजे  या दोन स्थानकांमधील 117 किमीचे अंतर रेल्वेने केवळ 17 मिनिटांत पूर्ण केल्याची नोंद कागदावर झालेली आहे. जर तसे प्रत्यक्षात झाले असते तर या रेल्वेचा वेग 409 किमी प्रतीतास होतो. मात्र प्रत्यक्षात ही रेल्वे कमाल 130 किमी वेगाने धावू शकते. जर कमाल 130 किमी वेगाने जरी रेल्वेने प्रवास केला असता तरीही या अंतरासाठी 53 मिनिटांचा अवधी लागला असता.जयपूर अलाहाबद एक्सप्रेसच्या बाबतीतही असेच झाले असून 10 एप्रिल 2017 रोदी फतेहपूरला सकाळी 5 वाजून 56 मिनिटांनी आलेली ही ट्रेन अलाहाबादला सकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी म्हणजे त्यावेळेच्या कितीतरी आधी पोहोचल्याचे दाखविण्यात आले. आता हे घड्याळाचे काटे उलटे कसे फिरले याचे उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांनाच विचारायला हवे.कॅगच्या मते असे गोंधळ रेल्वेच्या इतर विभागांमध्येही झाले असावेत. तर रेल्वे अधिकारी ही मानवी चूक असल्याचे सांगत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेBullet Trainबुलेट ट्रेन