शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हा सगळ्यांना चपलेनं मारेन; भाजपा आमदाराची अधिकाऱ्यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 15:51 IST

शेतकऱ्यांकडून कमिशन मागणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजपा आमदाराची धमकी

महोबा: उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातल्या भाजपा आमदारानं अधिकाऱ्यांना चपलेनं मारण्याची धमकी दिली आहे. ब्रजभूषण राजपूत असं या आमदाराचं नाव आहे. याआधी राजपूत यांनी महोबा जिल्ह्याचे डीएम आणि एसपींना चोर, दलाल म्हणून वाद निर्माण केला होता. त्यानंतर आता राजपूत यांनी अधिकाऱ्यांना जाहीरपणे जोडे मारण्याची धमकी दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी आमदार ब्रजभूषण राजपूत वेश बदलून गहू खरेदी केंद्रावर गेले होते. तिथे त्यांनी आपल्याला गहू विकायचा असल्याचं सांगितलं. त्यावेळी खरेदी केंद्राचा प्रभारी असलेल्या व्यक्तीनं लाच मागितली. या घटनेचं राजपूत यांनी स्टिंग ऑपरेशन केलं. हा व्हिडीओ जारी करत असताना राजपूत यांचा स्वत:च्या जीभेवरील ताबा सुटला. त्यांनी अधिकाऱ्यांना चपलेनं मारण्याची धमकी दिली. 'अशा प्रकारचं वर्तन खपवून घेणार नाही. मी तुम्हाला चपलेनं मारेन. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास मी माझ्या चपलेनं यांची धुलाई करेन. माझ्याविरोधात गुन्हा दाखल करायचा असल्यास बिनधास्त करा,' असं राजपूत म्हणाले. 'माझ्या शेतकऱ्याकडे पैसे मागितले, त्याचं शोषण केलं, तर प्रत्येक अधिकाऱ्याचा अपमान होईल. त्याला चपलेनं मारेन. मग तो अधिकारी पैसे मागताना नक्की विचार करेल,' असं राजपूत यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :BJPभाजपा