शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Uttar Pradesh Assembly Elections 2022: कुठे चिखलफेक तर कुठे दगडफेक, पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला मोठा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 10:53 IST

Uttar Pradesh Assembly Elections 2022: पुढच्या महिन्यात 10 आणि 14 फेब्रुवारीला पश्चिम यूपीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

कानपूर: पुढच्या महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक 2022 च्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. 10 आणि 14 फेब्रुवारी रोजी पश्चिम यूपीमध्ये हे मतदान होणार आहे. पण, राज्यातील या भागात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. प्रचारादरम्यान अनेकांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तर काही जणांवर चिखलफेक आणि दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत.

भाजप उमेदवारावर हल्ला2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळवला होता. मात्र, यावेळी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाची युती आणि शेतकरी आंदोलनामुळे ग्रामस्थांची नाराजी यामुळे येथे सत्ताधाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. अशाच एका प्रकरणात शिवलखास विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मनिंदरपाल सिंग यांच्यावर 24 जानेवारी रोजी चुर गावात हल्ला झाला होता. या प्रकरणात सिंग यांनी तक्रार दाखल केली नाही, परंतु पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि गुरुवारी 20 नावांसह आणि इतर 65 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला.

'आम्ही त्यांना माफ केले'इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सिंह म्हणाले, "माझ्या ताफ्यातील 7 वाहनांवर दगडफेक करण्यात आली, तरीही मी या संदर्भात तक्रार दाखल केलेली नाही. हे आमचेच लोक आहेत, मी त्यांना माफ केले. लोकशाहीत मते मागणाऱ्यांबाबत अशा घटना घडू नयेत.'' पोलिस एफआयआरनुसार, ज्या लोकांनी भाजप नेत्याच्या ताफ्यावर दगडफेक केली त्यांच्याकडे राष्ट्रीय लोकदलाचा झेंडा होता. सरधना पोलिस स्टेशनचे प्रभारी लक्ष्मण वर्मा यांनी यासंदर्भात सांगितले की, 'आम्ही घटनेच्या व्हिडिओ फुटेजद्वारे त्यांची ओळख पटवत आहोत. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

भाजप आमदाराला घातला खेरावगुरुवारी संध्याकाळी मुझफ्फरनगरमधील खतौली येथील भाजप आमदार आणि विद्यमान उमेदवार विक्रम सैनी यांना भैंसी गावात शेतकऱ्यांच्या जमावाने घेराव घातला आणि भाजपविरोधी घोषणा दिल्या. यावेळी अनेक आंदोलक ‘तुम्ही 5 वर्षांनी इथे आलात’ अशा घोषणा देत होते. रिपोर्टनुसार, सैनी यांनी दिल्लीजवळील सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका केली होती. सैनी यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील मुन्नावर कलान गावात अशाच आंदोलनाला सामोरे जावे लागले होते. या आंदोलनांबाबत त्यांना विचारले असता सैनी म्हणाले की, 'ही काही नवीन गोष्ट नाही. निवडणुकीच्या प्रचारात अशा घटना घडत असतात.'

प्रचारासाठी येऊ दिले नाहीयाशिवाय बागपतमधील छपरौली येथील भाजपचे उमेदवार सहेंद्र रमला यांना शुक्रवारी दाहा गावात काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना प्रचारासाठी निरुपडा गावात येऊ दिले नाही. वृत्तपत्रानुसार, बिजनौरच्या ताहारपूर गावातील भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, लोकांचा हा संताप रास्त आहे. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत राहिल्यास त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी