शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election: 'दंगल-हाणामारी करा, पण उमेदवाराला विजयी करा', माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 10:00 IST

Uttar Pradesh Assembly Election: या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी माजी आमदार आणि समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रयागराज: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचे (Uttar Pradesh Assembly Election) दोन टप्पे पार पडले असून सर्व राजकीय पक्ष तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. या प्रचारादरम्यान एका माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे. 'निवडणूक जिंकण्यासाठी दंगल आणि हिंसाचार करा', असे वक्तव्य प्रयागराजचे माजी आमदार आणि सपाविरोधात बंड करुन भाजपमध्ये दाखल झालेले रामसेवक पटेल यांनी केले आहे. 

समर्थकांना कोणत्याही थराला जाण्याचा सल्लाप्रयागराजमधून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना माजी आमदार रामसेवक पटेल म्हणाले की, 'उमेदवाराला विजयी करण्यासाठी दंगल झाली तरी हरकत नाही, पण उमेदवार विजयी झाला पाहिजे.' प्रयागराजमध्ये येत्या 27 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी रामसेवक पटेल यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही मर्यादा ओलांडण्याचा सल्ला दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले माजी आमदार?मांडा भागात भाजप उमेदवार नीलम कारवारिया यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत माजी आमदार रामसेवक पटेल यांच्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला. दंगल झाली तरी उमेदवाराला विजयी करा, असे रामसेवक पटेल यांनी मंचावरुन सांगितले. रामसेवकाचा हा व्हिडिओ मेढा विधानसभा मतदारसंघातील आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केलारामसेवकाचा हा प्रक्षोभक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मांडा पोलिस ठाण्यात रामसेवक आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भडकाऊ भाषण आणि एका विशिष्ट जातीबद्दल अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Samajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा