शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Uttar Pradesh Assembly Election: काँग्रेस- सपाचा छुपा करार? सपावर टीका करणे टाळताहेत काँग्रेसचे नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 06:24 IST

२०१७ मधील प्रयोगानंतर आणि स्वतंत्रपणे लढल्याच्या अनुभवानंतर या दोन्ही पक्षांनी आपापल्या मार्गांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतून समाजवादी पार्टीशी (सपा) त्यांनी छुपा करार केला असावा, असे संकेत आहेत. २०१७ मधील प्रयोगानंतर आणि स्वतंत्रपणे लढल्याच्या अनुभवानंतर या दोन्ही पक्षांनी आपापल्या मार्गांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आखलेले धोरण आणि पक्षाने जाहीर केलेली उमेदवारांची पहिली यादी यात संगती दिसत नाही.भाजपमधून सपात नेते जाताना वाहिन्यांवरील वादविवादांत काँग्रेसचे प्रवक्ते काहीसे आनंदी दिसत होते. काँग्रेसच्या ट्विटर हँडलने एकापेक्षा जास्त ट्विट्समध्ये म्हटले की, १६ जण सोडून गेले असून, आणखी काही रांगेत उभे आहेत. हे सांगण्याचा आविर्भाव हा भाजपमधून लोक जणूकाही काँग्रेस पक्षात येत आहेत, असा होता. आपले स्वत:चे आमदार इमरान मसूद हेच सपात गेले आहेत याचाच विसर या प्रवक्त्यांना पडला. ललितेश त्रिपाठी हे काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) गेल्यावर त्यांचा निषेध पक्षाने केला नाही. सपाने ही जागा युतीमध्ये टीएमसीला दिली. भाजपमध्ये खिंडार पाडण्यात आपल्याला अपयश आले; परंतु सपा ते काम करीत आहे, याचाच काँग्रेसला दिलासा असेल. पक्षाचे नेते सपावर टीका करणे टाळत आहेत. काँग्रेसने १२५ तिकिटे दिली असून, त्यातील ब्राह्मणांना दिलेल्या २० जागांसह ४७ जागा या उच्चवर्णीयांना मिळाल्या आहेत.उमेदवार देणार नाहीपक्षाने २० मुस्लिमांनाही तिकिटे दिली असून, त्यातील बहुतेक एक अपवाद वगळता सारख्या नावांची आहेत. उल्लेखनीय म्हणजे बलात्कार पीडितेच्या आईच्या विरोधात सपा कदाचित उमेदवार देणार नाही.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी