शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ७ टप्प्यात, १० मार्च रोजी निकाल; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 3:49 PM

Uttar Pradesh Assembly Election 2022, Dates Announced: उत्तर प्रदेशात एकूण ८ टप्प्यात मदतान होणार आहे. नेमका कसा आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाणून घेऊयात...

UP Assembly Election 2022, Dates Announced: कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनं उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहेच. पण राजकीय दृष्ट्यादेखील हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ४०३ जागांसाठी एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. यात अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी सातही टप्प्यांसाठीचा निकाल जाहीर होणार आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ १४ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. उत्तर प्रदेशात ४०४ विधानसभा आणि विधान परिषदेत १०० सदस्य असतात. उत्तर प्रदेशात सध्या भाजपाचे सरकार आहे. तर मुख्य विरोधी पक्षात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचा समावेश आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण ४०४ सदस्यांमध्ये ४०३ निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. 

२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं ३१२ जागांवर घवघवीत यश प्राप्त करत सत्ता स्थापन केली होती. भाजपाला निवडणुकीत एकूण ३९.६७ टक्के मतं मिळाली होती. तर समाजवादी पक्षानं ४७ आणि बहुजन समाज पक्षानं १९ जागांवर विजय प्राप्त केला होता. काँग्रेसला केवळ सात जागा प्राप्त झाल्या होत्या. 

असा आहे  उत्तर प्रदेशचा निवडणूक कार्यक्रम-

पहिला टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- १४ जानेवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- २१ जानेवारी २०२२अर्ज छाननी- २४ जानेवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- २७ जानेवारी २०२२मतदान- १० फेब्रुवारी २०२२

दुसरा टप्पा- अर्ज दाखल करण्याची तारीख- २१ जानेवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- २८ जानेवारी २०२२अर्ज छाननी- २९ जानेवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- ३१ जानेवारी २०२२मतदान- १४ फेब्रुवारी २०२२

तिसरा टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- २५ जानेवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- १ फेब्रुवारी २०२२अर्ज छाननी- २ फेब्रुवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- ४ फेब्रुवारी २०२२मतदान- २० फेब्रुवारी २०२२

चौथा टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- २७ जानेवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- ३ फेब्रुवारी २०२२अर्ज छाननी- ४ फेब्रुवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- ७ फेब्रुवारी २०२२मतदान- २३ फेब्रुवारी २०२२

पाचवा टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- १ फेब्रुवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- ८ फेब्रुवारी २०२२अर्ज छाननी- ९ फेब्रुवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- ११ फेब्रुवारी २०२२मतदान- २७ फेब्रुवारी २०२२

सहावा टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- ४ फेब्रुवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- ११ फेब्रुवारी २०२२अर्ज छाननी- १४ फेब्रुवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- १६ फेब्रुवारी २०२२मतदान- ३ मार्च २०२२

सातवा टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- १० फेब्रुवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- १७ फेब्रुवारी २०२२अर्ज छाननी- १८ फेब्रुवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- २१ फेब्रुवारी २०२२मतदान- ७ मार्च २०२२

१० मार्च २०२२ रोजी मतमोजणी होईल. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradeshउत्तर प्रदेशElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव