शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उमेदवारी अर्ज भरायला झाला उशीर, वकिलांसह मंत्री महोदय पळतच सुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 13:31 IST

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उपेंद्र तिवारी यांनी फेफना विधानसभा मतदारसंघातून 4 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला

लखनौ - निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्यादिवशी शक्तीप्रदर्शन करत आणि सर्वांचे अर्ज दाखल झाल्यानंतरच आपण भरावा, अशी अनेकांची मनस्थिती असते. त्यानुसार, उमेदवाराची शेवटच्यादिवशी अर्ज भरताना चांगलीच दमछाक होते. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठीही एका उमेदवाराची अशीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे राज्याचे क्रीडामंत्री असलेल्या उपेंद्र तिवारी यांनी धावत-पळत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचावं लागलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

उपेंद्र तिवारी यांनी फेफना विधानसभा मतदारसंघातून 4 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी, अर्ज भरण्याची वेळ आणि मुदत संपत असल्याने त्यांनी थेट धावत-पळत कार्यालय गाठले. सगळ्यात हारांच्या माळा आणि सोबत वकिल मंडळींना घेऊन ते पळत-पळत अर्ज भरण्यासाठी पोहोचले. यावेळी, माध्यम प्रतिनीधींनी त्यांचा व्हिडिओ शूट केला. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, ते जोरजोरात पळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.  उपेंद्र तिवारी यांच्या अर्जातील संपत्ती विवरणपत्रानुसार गेल्या 5 वर्षांत त्यांच्या संपत्तीत दुप्पटीने वाढ झाली आहे. उपेंद्र यांची संपत्ती 2 कोटी 85 लाख 74 हजार 632 रुपए एवढी आहे. यापूर्वी, 2017 मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांची संपत्ती 1 कोटी 21 लाख 50 हजार 33 रुपये एवढी होती. त्यामुळे, यंदाच्या शपथपत्रानुसार त्यांच्या संपत्तीत 5 वर्षात दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसून येते.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथElectionनिवडणूक