शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

Uttar Pradesh Assembly Election 2022 : ED च्या अधिकाऱ्याची सोमवारी स्वेच्छानिवृत्ती, मंगळवारी भाजपने दिली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:11 IST

Uttar Pradesh Assembly Election 2022: युपीत भाजने मोठा डाव खेळला आहे. काही दिवसांपूर्वीच अपर्णा यांना भाजपात प्रवेश दिला, मात्र त्यांना हवा असलेला मतदारसंघ दिला नाही.

लखनौ - राज्यातील 5 विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला काही जिल्ह्यांत आता लवकरच ब्रेक लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 10 फेब्रुवारी रोजी सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चांगलंच राजकारण पाहायला मिळत आहे. विशेषत: उत्तर प्रदेशात फोडाफोडीचं आणि जोडाजोडीचं राजकारण होत आहे. सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादवांची सून अपर्णा यादवांना यादव कुटुंबापासून फोडण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपाने त्यांना उमेदवारी दिलीच नाही. तर, रिटा बहुगुणा यांच्या मुलाचंही तिकीट कापण्यात आलं आहे.

युपीत भाजने मोठा डाव खेळला आहे. काही दिवसांपूर्वीच अपर्णा यांना भाजपात प्रवेश दिला, मात्र त्यांना हवा असलेला मतदारसंघ दिला नाही. लखनऊच्या कैंट विधानसभा मतदारसंघातून लढण्याची अपर्णा यांची इच्छा होती, गेल्या काही काळापासून त्या या मतदारसंघात राबतही होत्या, मात्र, जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा भाजपाने आपल्या मंत्र्यालाच उमेदवारी देऊन टाकली आहे. योगी सरकारमध्ये कायदे मंत्री असलेले बृजेश पाठक यांना भाजपाने लखनऊ कैंटमधून उतरविले आहे. ते गेल्यावेळी लखनौ मध्यचे आमदार होते. भाजपने लखनौसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये, ईडीमधील माजी अधिकाऱ्याला तिकीट दिलं आहे. 

ईडीतील माजी सहआयुक्त राजेश्वर सिंह यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. लखनौच्या सरोजनी नगर विधानसभा मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तिकीट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सोमवारीच सिंह यांची स्वेच्छानिवृत्ती केंद्र सरकारने स्विकारल्याचं ट्विट त्यांनी स्वत: केलं होतं. सन 2007 मध्ये ते अंमलबजावणी संचानालय म्हणजे ईडीमध्ये कार्यरत झाले होते. तत्पूर्वी त्यांनी उत्तर प्रदेश प्रशासनात 10 पोलीस खात्यात काम केलं असून 14 वर्षे ते ईडी विभागात कार्यरत होते. 

प्रयागराजच्या भाजपा खासदार रीटा बहुगुणा जोशी यांच्या मुलाला देखील भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळ मयंक जोशी हे सपामध्ये जाण्याची शक्यता आहे. रीटा या दोनदा या मतदारसंघातून आमदार राहिलेल्या आहेत. 

कँट मतदारसंघातून नवीन चेहरा

अपर्णा यादव या लखनऊ कँटमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होत्या. 2017 च्या निवडणुकीत अपर्णा यादव यांनी या जागेवरून आपले नशीब आजमावले होते, परंतु रीटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. अशा स्थितीत भाजपच्या दोन्ही नेत्यांची मागणी फेटाळण्यात आली. लखनौ कँट विधानसभा मतदारसंघातून 2017 च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेस सोडून पक्षात प्रवेश केलेल्या रीटा बहुगुणा जोशी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, लोकसभेवर निवडून आल्यानंतर रिटा बहुगुणा जोशी यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 2019 मध्ये पोटनिवडणूक झाली ज्यात भाजपचे सुरेशचंद्र तिवारी विजयी झाले होते. यंदा, भाजपने कायदामंत्री असलेल्या बृजेश पाठक यांना येथून उमेदवारी दिली आहे.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपाlucknow-pcलखनऊUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२