शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश विधानसभा : भाजपकडून ३० टक्के आमदारांना संधी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:55 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक : काँग्रेसही झाली सक्रिय

ठळक मुद्देकाँग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टीने उमेदवारांच्या निवडीसाठी मंथन करून संभाव्य उमेदवारांबाबत गोपनीय सूचना गोळा करायला सुरुवात केली आहे. 

शीलेश शर्मा नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विद्यमान आमदारांपैकी ३० टक्क्यांना व काही मंत्र्यांना संधी देणार नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टीने उमेदवारांच्या निवडीसाठी मंथन करून संभाव्य उमेदवारांबाबत गोपनीय सूचना गोळा करायला सुरुवात केली आहे. 

राज्यातील वरिष्ठ मंत्र्याने नाव न सांगता ‘लोकमत’शी बोलताना म्हटले की, ‘भाजप नेतृत्वाने जी प्रारंभिक यादी तयार केली आहे त्यानुसार विद्यमान आमदारांतील जवळपास ३० टक्के घरी बसवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, यावेळी संधी न मिळणाऱ्यांत काही विद्यमान मंत्रीही आहेत.’जातींच्या समीकरणात त्या भागात त्यांची प्रतिमा आणि नेतृत्वाबद्दल निष्ठा भाजपकडून उमेदवार बनविण्यासाठी आधार बनविला जात आहे.काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आपल्या कोअर ग्रुपशी चर्चा करून निवडणुकीच्या खूप आधी ४५ नेत्यांना म्हटले आहे की, तुम्ही आपापल्या क्षेत्रात जाऊन आतापासूनच निवडणुकीची तयारी करा. या ४५ जणांत विद्यमान आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नावे समाविष्ट आहेत. काँग्रेसची दृष्टी शेतकरी, अल्पसंख्य आणि ब्राह्मण नावांवर असली तरी नावे निश्चित करताना क्षेत्रीय संतुलन आणि जातीय समीकरण केंद्र असेल.समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षात अजून नावांबद्दल अनिश्चितता असल्यामुळे या दोन्ही पक्षांत संभाव्य उमेदवारांची अजून कोणतीही यादी तयार नाही.

महाराष्ट्रातून यूपीमध्ये ५० हजार जण जाणार प्रचारासाठीलखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत प्रचारासाठी महाराष्ट्रातून ५० हजार उत्तर भारतीय जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशातून सुमारे तीन कोटी लोक रोजगारासाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. या मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या उत्तर प्रदेशातील लोकांना संघटित करण्याची जबाबदारी श्वेता शालिनी यांना देण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघटनप्रमुख सुनील बन्सल, उत्तर प्रदेशमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांची भेट घेऊन निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत चर्चा केल्याचे कळते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक