वडिलांना मगरीच्या जबड्यातून खेचून आणणाऱ्या उत्तर प्रदेशातील अजयराज चहर या बालकाच्या अचाट धैर्याची दखल घेत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज त्याचा राष्ट्रपती भवनात विशेष सन्मान केला. अजयराजला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान मिळाल्याची बातमी समजताच झारणापुरा हरलालपूर गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाली. अजयराज फक्त त्याच्या वडिलांनाच मगरीपासून वाचवले नाही तर, आमच्या गावालाही सन्मान मिळून दिला, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ही घटना जुलै २०२५ मधील आहे. आग्रा जिल्ह्यातील झारणापुरा हरलालपूर येथील शेतकरी वीरभान चहर हे आग्रा-धोलपूर सीमेवरील चंबळ नदीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा अजयराजही त्यांच्यासोबत होता. वीरभान नदीकाठी असताना अचानक पाण्यात दबा धरून बसलेल्या एका मगरीने त्यांचा पाय जबड्यात धरला आणि त्यांना खोल पाण्याकडे ओढू लागली. वडिलांचा ओरडण्याचा आवाज ऐकताच अजयराज तिथे धावून आला. वडिलांचा पाय मगरीच्या जबड्यात पाहून तो डगमगला नाही. त्याने क्षणाचाही विलंब न लावता जवळच पडलेली बाभळीची एक जाड काठी उचलली आणि मगरीवर तुटून पडला. मगरीच्या डोळ्यावर आणि तोंडावर त्याने जोरदार प्रहार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मगर बिथरली आणि तिने वीरभान यांना सोडून पाण्यात पळ काढला.
मगरीच्या हल्ल्यात वीरभान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात आणि नंतर आग्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, अजयराजने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे वीरभान यांचे प्राण वाचू शकले. अजयराजच्या या शौर्याची वार्ता राज्यभर पसरली आणि अखेर त्याची दखल केंद्र सरकारने घेतली. आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजयराजला सन्मानित केले.
Web Summary : A brave boy, Ajayraj, saved his father from a crocodile's jaws in Uttar Pradesh. He fought off the reptile with a stick. President Murmu honored him for his courage. The village celebrated Ajayraj's bravery and recognition.
Web Summary : उत्तर प्रदेश में अजयराज नामक एक बहादुर लड़के ने अपने पिता को मगरमच्छ के जबड़े से बचाया। उन्होंने एक छड़ी से मगरमच्छ से लड़ाई की। राष्ट्रपति मुर्मू ने उन्हें उनकी बहादुरी के लिए सम्मानित किया। गांव ने अजयराज की बहादुरी और पहचान का जश्न मनाया।