शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

'18 वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक संबंध ठेऊ शकता, पण लग्न करू शकत नाही? लग्नाचा PM मोदींना काय त्रास?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 19:16 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, AIMIM प्रमुख असुदुद्दीन ओवेसी मिरत येथे जाहीर सभेला संबोधित करत होतो.

केंद्रातील मोदी सरकारने मुलींच्या लग्नाचे किमान वय  पुरुषांच्या बरोबरीने म्हणजेच 18 वरून 21 वर्षे करण्याचा  निर्णय घेतला आहे. यावर आता एआयएमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ओवेसी म्हणाले, 'आता केंद्राने महिलांसाठी लग्नाचे कायदेशीर वय 21 वर्षे केले आहे. कायद्यानुसार 18 वर्ष वय असताना तुम्ही महिलेसोबत लैंगिक संबंध ठेऊ शकता, पण 18 व्या वर्षी तिच्याशी लग्न करू शकत नाही? लग्नासंदर्भात मोदींना काय समस्या? आता भाजप म्हणेल ओवेसी आणि मुस्लीम महिलांच्या हितासंदर्भात बोलत नाहीत. मोदीजी, तुम्ही आमचे काका कधी झाले? काका फक्त बसून प्रश्न विचारतात, आता काका म्हणतायत लग्न करू नका.'

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, AIMIM प्रमुख असुदुद्दीन ओवेसी मिरत येथे जाहीर सभेला संबोधित करत होतो. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला. एवढेच नाही, तर त्यांनी पंतप्रधान मोदींवरही जोरदार टीका केली. जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, मी तुम्हा सर्वांना आवाहन करण्यासाठी आलो आहे, यूपीमधील 19 टक्के मुस्लिमांना त्यांची राजकीय ताकद, नेतृत्व आणि भागीदारीची गरज आहे, जेणेकरून आपल्या तरुणांना सन्मान, शिक्षण मिळेल आणि अत्याचार, भेदभाव दूर करता येईल. एवढेच नाही, तर मुस्लीम कधी जागे होणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

लखीमपूर खेरी घटनेचा संदर्भ देत ओवेसी म्हणाले, केंद्र सरकारमधील गृह राज्यमंत्री टेनी यांनी कट रचला आणि परिणामी त्यांच्या मुलाने चार शेतकर्‍यांची हत्या केली. यानंतर पीएम मोदी टेनी यांना सरकारमधून काढून टाकत नाहीत. जातीवादाचा आरोप करत ओवेसी म्हणाले, टेनी हे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण आहेत, यामुळे ते ब्राह्मण समाजाला दुखावू इच्छीत नाहीत. 

शाहजहांपूरमध्ये गंगा एक्सप्रेस वेच्या पायाभरणीसाठी आलेल्या पंतप्रधान मोदींवरही ओवेसींनी निशाणा साधला. ओवेसी म्हणाले, पीएम मोदी म्हणाले की, गंगा एक्सप्रेस वेचा सर्वांना फायदा होईल. नरेंद्र मोदीजी मिरत शहरातील वाहतूक समस्या सोडवू शकले नाही, ते गंगा एक्सप्रेस वे बांधणार. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीmarriageलग्न