शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना गुगलची आगळीवेगळी श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 11:12 IST

प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ज्यांच्या सनईनं होते, त्या भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना गुगलनं आगळीवेगळी मानवंदना दिली आहे.

नवी दिल्ली- प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ज्यांच्या सनईनं होते, त्या भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना गुगलनं आगळीवेगळी मानवंदना दिली आहे. सर्च इंजिनमध्ये सर्वात पुढे असलेल्या गुगलनं उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या 102व्या जन्मदिनाच्या निमित्तानं गुगलनं डुडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गुगलच्या होमपेजवरचं हे डुडल चेन्नईचे कलाकार विजय कृष्ण यांनी बनवलं आहे.उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी देश-परदेशात शहनाई वादनाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. गुगल डुडलनं उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना पांढ-याशुभ्र रंगाच्या पोशाखात शहनाई वाजवताना दाखवलं आहे. एका अनोख्या पद्धतीनं गुगलनं हे डुडल बनवलं आहे.या डुडलमध्ये त्यांच्या शहनाईतून धून निघत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ज्याला देशभरातून ऐकता येऊ शकतं आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचा जन्म 12 मार्च 1916 रोजी झाला होता. त्यांच्या नावामागेसुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. असं म्हणतात, त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या आजोबांनी अल्लाहचे आभार मानताना बिस्मिल्लाह असं म्हटलं. त्यामुळेच त्यांचं नाव बिस्मिल्लाह पडलं. फार कमी वयात त्यांनी ठुमरी, छैती, कजरी आणि स्वानी अशा भिन्न शैली त्यांनी आत्मसात केले होते. त्यानंतर त्यांनी संगीताचेही धडे गिरवले आणि अनेक रागांमध्ये प्रावीण्य संपादन केलं. 2001मध्ये त्यांना सर्वोच्च पुरस्कार भारतरत्ननंही सन्मानित करण्यात आलं आहे. तर 1968मध्ये त्यांना पद्मभूषण, 1980मध्ये पद्मविभूषण आणि 1961मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 

टॅग्स :googleगुगलDoodleडूडल