कत्तलखान्यातील प्राण्यांच्या व्यापारातील पैशाचा दहशतवादासाठी वापर - मनेका गांधी

By Admin | Updated: September 15, 2014 13:17 IST2014-09-15T09:15:36+5:302014-09-15T13:17:13+5:30

देशातील पशूंची कत्तलखान्यात अवैधपणे हत्या करून मिळणा-या पैशाचा दहशतवादासाठी वापर होतो, असा आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी केला आहे.

Use of terrorism in the slaughter house for the sake of terrorism - Maneka Gandhi | कत्तलखान्यातील प्राण्यांच्या व्यापारातील पैशाचा दहशतवादासाठी वापर - मनेका गांधी

कत्तलखान्यातील प्राण्यांच्या व्यापारातील पैशाचा दहशतवादासाठी वापर - मनेका गांधी

ऑनलाइन टीम

जयपूर, दि. १५ -  देशातील दुभत्या जनावरांची कत्तलखान्यात अवैधपणे हत्या करून मिळणा-या पैशाचा दहशतवादासाठी वापर होतो, असा आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी केला आहे. भारतात हा व्यापार बनल्याचेही त्या म्हणाल्या. दूध देणा-या प्राण्यांच्या मांसाच्या निर्यातीवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. 'इंडिया फॉर अ‍ॅनिमल्स' या कार्यक्रमात त्या बोलत हो्त्या. 
भारतात रोज चीनपेक्षा जास्त जनावरे मारली जातात, अनेक दुभत्या प्राण्यांना मारून त्यांच्या मांसाची अवैधरित्या बांग्लादेश व मध्य-पूर्व ाशियातील देशात विक्री केली जाते, असे त्या म्हणाल्या. खाटिक मुस्लिम असेल पण त्या प्राण्यांचे मालक हे हिंदू अथवा इतरधर्मीय असताता, असे सांगत  हा प्रकार कोणत्याही एका विशिष्ट धर्माशी संबंधित नसल्याचे त्या म्हणाल्या. 

 

Web Title: Use of terrorism in the slaughter house for the sake of terrorism - Maneka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.