पीक विम्यासाठी आता उपग्रहाचा वापर
By Admin | Updated: February 23, 2015 23:32 IST2015-02-23T23:32:58+5:302015-02-23T23:32:58+5:30
शेतक-याना पीकविमा देण्यासाठी उपग्रहाचा वापर करण्याची तयारी सरकारने चालविली आहे. देशातील प्रत्येक शेतजमीन आता डिजिटल नकाशावर दिसणार

पीक विम्यासाठी आता उपग्रहाचा वापर
नवी दिल्ली : शेतक-याना पीकविमा देण्यासाठी उपग्रहाचा वापर करण्याची तयारी सरकारने चालविली आहे. देशातील प्रत्येक शेतजमीन आता डिजिटल नकाशावर दिसणार असून या उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या डाटाचा वापर पिकांचा विमा निश्चित करण्यासाठी केला जाणार आहे.
विमा नियामक, विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए)या प्रस्तावावर चर्चा चालविली असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
असे केले जाईल मोजमाप
शेतजमिनीचा डिजिटल नकाशा तयार करून जीपीएसच्या आधारे (ग्राऊन्ड पोझिशनिंग सिस्टिम)मोजमाप करतानाच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विमा देण्याची कल्पना समोर आली आहे. त्यात वैयक्तिक जोखमीचाही समावेश असेल. सध्या केवळ शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज घेतले असेल तरच विमा (इन्श्युरन्स कव्हर)काढलो जातो. शेतीच्या अन्य कोणत्याही कामांसाठी विम्याची सोय उपलब्ध नाही.
असा ठरेल विमा
देशातील शेतीजमिनीचा आकार लहान असल्यामुळे उपग्रहाच्या आधारे अंदाज काढणे उपयुक्त ठरणार आहे. उपग्रहाच्या आधारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांच्या आधारे शेतीचा उत्पादन निर्देशांक (व्हिजिटेटिव्ह इन्डेक्स)ठरविला जाईल.