शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 04:41 IST

पश्चिम बंगालमध्ये सुकनाच्या ३३ कोअर ‘त्रिशक्ती’वर केले शस्त्रपूजन...

नवी दिल्ली : भारताने आजवर कधीच केवळ घृणा वा द्वेषातून कोणत्या देशावर हल्ला केला नाही. पण, देशहिताला बाधा येणार असेल किंवा धोका निर्माण झाला तर धाडसी पाऊल उचलण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी दिला.

पश्चिम बंगालमध्ये सुकना लष्करी केंद्रावर शस्त्रपूजनाच्या वेळी ते बोलत होते. शस्त्रपूजेचे हे अनुष्ठान म्हणजे गरज पडेल तेव्हा शस्त्र व उपकरणांचा पूर्ण शक्तिनिशी वापर करण्यासाठीचे स्पष्ट संकेत असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. शस्त्रपूजा म्हणजे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा रक्षक म्हणून शस्त्रांचे पूजन आणि त्यांचा सन्मान करणे होय, असे ते म्हणाले. सुकमास्थित ३३ कोअरला त्रिशक्ती म्हणूनही ओळखले जाते. सिक्कीम सेक्टरमध्ये चीनलगत असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेच्या सुरक्षेची जबाबदारी या सैन्यदलावर आहे. 

लष्करी मुख्यालयात शस्त्रपूजन-राजनाथसिंह यांनी सोशल मीडियावर नमूद केले की, ‘भारतात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन करण्याची मोठी आणि जुनी परंपरा आहे.-आज दार्जिलिंगच्या सुकना भागात ३३-कोअर मुख्यालयात शस्त्रपूजन करण्यात आले.’ यासोबत राजनाथ यांनी एक छायाचित्रही पोस्ट केले. यात लष्करप्रमुख जन. उपेंद्र द्विवेदी, काही वरिष्ठ अधिकारी व जवान दिसत आहेत. -शुक्रवारी गंगटोकमध्ये लष्कराच्या कमांडर्सचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात राजनाथसिंह सहभागी होणार होते. परंतु, सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये वाईट हवामानामुळे ते पोहोचू शकले नाहीत. त्यांनी सुकना येथूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जवानांशी संवाद साधला.

अरुणाचलमध्ये  प्रकल्पांचे उद्घाटनसंरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी सीमा रस्ते संघटनेच्या अरुणाचल प्रदेशातील १८ प्रकल्पांचे उद्घाटन केले. इतर भागांतील ७५ पायाभूत क्षेत्रातील प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यात तीन प्रमुख रस्ते मार्ग, १४ पूल आणि एका हेलिपॅडचा समावेश आहे. राज्यपाल के. टी. परनाईक यांनी ईटानगरहून व्हीसीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला. या प्रकल्पांबद्दल अरुणाचलची जनता व केंद्र सरकारचे त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विधि व न्यायमंत्री केंटो जिनी यांनी पश्चिम सियांग जिल्ह्यातील आलो येथे झालेल्या उद्घाटन समारंभात उपस्थिती लावली. राज्यात या प्रकल्पांमुळे संपर्क माध्यमांत सुधारणा होऊन अनेक गावे जोडली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहDasaraदसरा