शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोविड लसीकरणासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 06:26 IST

Narendra Modi News : चौथ्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’चे (आयएमसी-२०२०) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले.

नवी दिल्ली : कोविड-१९ लसीकरण मोहिमेसाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ही लस लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.चौथ्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’चे (आयएमसी-२०२०) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले की, भारतास दूरसंचार उत्पादने, त्यांचे डिझाइन, विकास आणि निर्मिती याचे मोठे केंद्र बनविण्याची सरकारची योजना आहे. येत्या तीन वर्षांत प्रत्येक गाव व खेडे हायस्पीड फायबरने जोेडले जाईल. त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. भारतातील मोबाइल दर सर्वाधिक कमी आहेत. आपला ॲप बाजार सर्वाधिक वेगाने वाढत आहे. मोदी यांनी सांगितले की, ५जी मोबाइल सेवा लवकर सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे ‘मल्टी-जीबीपीएस पीक डेटा स्पीड’ उपलब्ध होऊ शकेल. ‘५-जी’साठी ४-जी मजबूत करा - रविशंकर प्रसाद नवी दिल्ली : देशात ५-जी तंत्रज्ञानाची वाट सुकर करण्यासाठी भारतीय कंपन्या व तंत्रज्ञांनी आधी ४-जी व्यवस्था मजबूत करावी, असे आवाहन विधि, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले.इंडियामोबाइल काँग्रेसला संबोधित करताना प्रसाद यांनी सांगितले की, आता उपलब्ध असलेली ४-जी तंत्रज्ञान व्यवस्था अधिक मजबूत होणे हे भारतीय सुरक्षेसाठीही महत्त्वाचे आहे. भारताकडे गुणवत्ता आणि नावीन्याची उत्तम ऊर्मी आहे. ५-जी निर्मितीत पुढे जायचे असेल तर ४-जी प्रक्रिया मजबूत होणे अत्यावश्यक आहे, असेही या वेळी म्हणाले  

साथीमुळे डिजिटीकरणास गती : मित्तलभारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे देशाच्या डिजिटीकरणास गती मिळाली आहे. विविध उत्पादने आणि सेवा यांच्या डिजिटल पर्यायांची स्वीकारार्हता वाढली आहे. आगामी दोन ते तीन वर्षांत ५जी मोबाइल तंत्रज्ञान सामान्य होईल. 

२०२१मध्ये आणणार  ५ जी : मुकेश अंबानी२०२१च्या दुसऱ्या सहामाहीत देशात ५जी मोबाइल सेवा सुरू होईल, असे सूतोवाच रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केले. मोबाइलचे हार्डवेअर उत्पादनही भारतात व्हायला हवे, तसेच अजूनही २जी फोन वापरणाऱ्या ३०० दशलक्ष ग्राहकांच्या हाती स्मार्टफोन देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे, असा आग्रह त्यांनी धरला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी