वासनापूर्तीसाठी महिला करतेय भूतांचा वापर, प्राध्यापकाची अजब तक्रार
By Admin | Updated: July 28, 2014 15:11 IST2014-07-28T14:53:13+5:302014-07-28T15:11:37+5:30
आत्मांच्या माध्यमातून एक महिला माझ्याशी शरीरसंबंध ठेवण्याचे प्रयत्न करते अशी अजब तक्रार मध्यप्रदेशमधील निवृत्त प्राध्यापकाने भोपाळ पोलिसांच्या सायबर शाखेकडे केली आहे.

वासनापूर्तीसाठी महिला करतेय भूतांचा वापर, प्राध्यापकाची अजब तक्रार
>ऑनलाइन टीम
भोपाळ, दि. २८ - शरीरसंबंध ठेवण्यासाठी एका महिलेने माझ्यामागे आत्मा लावली आहे. या आत्मांच्या माध्यमातून संबंधीत महिला माझ्याशी शरीरसंबंध ठेवण्याचे प्रयत्न करते अशी अजब तक्रार मध्यप्रदेशमधील निवृत्त प्राध्यापकाने भोपाळ पोलिसांच्या सायबर शाखेकडे केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीही ही तक्रार दाखल करुन घेत गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.
मध्यप्रदेशमधील इंदौर येथे राहणारे ६६ वर्षीय चंद्रप्रकाश त्रिवेदी हे वैदीक शास्त्राचे अभ्यासक असून याविषयावर त्यांनी १० पुस्तकही लिहीली आहेत. 'ओदिशा येथे राहणारी एक महिला हवेच्या दाब आणि चुंबकीय पद्धतीचा वापर करुन माझ्याशी शरीरसंबंध ठेवण्याचे प्रयत्न करत आहे' अशी अजब तक्रार त्रिवेदी यांनी केली आहे. दररोज रात्री माझ्यासोबत खोलीमध्ये कोणी तरी असल्याचे मला जाणवत राहते. यामुळे मी अनेकदा मो घरातून पळालो आहे असा दावा त्रिवेदींनी तक्रारीत केला आहे. पुरावा म्हणून त्रिवेदींनी संशयित महिलेने पाठवलेले ईमेल्सही पोलिसांसमोर सादर केले आहेत. त्रिवेदी मानसिक व शारीरिकरित्या सक्षम असल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात. 'माझी तक्रार बघून अनेकांना मी मनोरुग्णही वाटू शकतो. पण मी हे दररोज अनुभवतोय असे सांगत त्रिवेदी त्यांची तक्रार खरी असल्याचे आवर्जून सांगतात.
सायबर विभागानेही त्रिवेदींची तक्रार नोंदवून घेतली असून या प्रकरणाचा तपासही सुरु केला आहे. 'नेहमी येणा-या तक्रारींपेक्षा ही तक्रार खूप वेगळी आहे.पण आम्ही तक्रार नोंदवून घेण्यास नकार देऊ शकत नाही असे सायबर विभागाचे प्रमुख एन.के. झारीयांनी सांगितले. ही तक्रार एखाद्या अतिविचार करणा-या व्यक्तीच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार असू शकते, अंमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेले मानसिक परिणामही असू शकतील किंवा तक्रार खरीही असू शकते. आधी याचा तपास करणे गरजेचे महत्त्वाचे आहे असे झारीयांनी स्पष्ट केले.
मध्यप्रदेशमधील पोलिसांनी भूताचा तपास केल्याची ही पहिली घटना नव्हे. यापूर्वी २०११ मध्ये एका व्यक्तीने आत्मा रात्री झोपू देत नाहीत अशी तक्रार सर्वांसमक्ष पोलिस महासंचालकांकडे दिली होती. यानंतर महासंचालकांनी या तक्रारीचा तपास करण्याचे फर्मान काढले होते. तर २००७ आत्म्यांनी चोरी केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला होता.