राजकिय फायद्यासाठी CBIचा वापर - देवप्रीत सिंह
By Admin | Updated: December 16, 2015 18:50 IST2015-12-16T18:50:28+5:302015-12-16T18:50:28+5:30
काही मोजक्या लोकांचा समुदाय आपला राजकिय फायदा करण्यासाठी कालपासून CBI बाबत खोट बोलत आहेत तसच चुकीचा प्रचार करत आहेत असे CBI ची प्रवक्ता देवप्रीत सिंहनी माध्यमासमोर मांडले.

राजकिय फायद्यासाठी CBIचा वापर - देवप्रीत सिंह
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - काही मोजक्या लोकांचा समुदाय आपला राजकिय फायदा करण्यासाठी कालपासून CBI बाबत खोट बोलत आहेत तसच चुकीचा प्रचार करत आहेत असे CBI ची प्रवक्ता देवप्रीत सिंहनी माध्यमासमोर मांडले. CBI ला कामाचे पुर्णपणे स्वतंत्र्य आहे, दिल्लीच्या सचिव कार्यालयातून मिळालेला दस्तावेज न्यायालयात सादर केला जाईल तसेच CBI छापेमारीत आम्ही कोणाच्या कामकाजात दखल दिली नाही अथवा बाधा आणली नाही, आम्ही मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाची छाणणी आणि त्यांच्या कोणत्याही दस्तावेजास तपासले नाही आम्ही आमचे काम केलं आहे.
काल CBI ने दिल्ली येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच्या प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापा मारला त्यातून राजकीय वातावरण तापले आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ झाला. केजरीवालांनी आपल्या कार्यालयावर छापा मारण्यात आल्याचा दावा करीत, थेट पंतप्रधानांना लक्ष्य बनविले. मोदी हे भित्रे आणि मनोरुग्ण असल्याचा आरोपही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला, परंतु अर्थमंत्री अरुण जेटली आणि स्वत: सीबीआयने केजरीवालांच्या कार्यालयावर छापा मारण्यात आल्याचा दावा फेटाळला. या प्रकारावरून केंद्र आणि दिल्लीच्या आप सरकारमधील संघर्ष शिगेला पोहोचला असल्याच दिसते.
सीबीआयने काल सकाळी दिल्ली सचिवालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शोधमोहीम पार पाडली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या चमूने छापा मारला, त्याच मजल्यावर केजरीवालांचे कार्यालयही आहे. गेल्या काही वर्षांत दिल्ली सरकारच्या निविदा एका फर्मला मिळवून देताना राजेंद्र कुमार यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. दिल्ली संवाद आयोगाचे माजी सचिव आशीष जोशी यांनी राजेंद्रकुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वॉरंट मिळविल्यानंतर राजेंद्र कुमार यांचे कार्यालय आणि निवासस्थानावर छापे मारण्यात आल्याचा दावाही सीबीआयने केला.