शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नोबेल विजेत्या US अध्यक्षाने महाराष्ट्रात बांधली होती १०० घरे; भारताकडून हवी होती अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:49 IST

कार्टर यांनी लाेणावळाजवळच्या पाटण या गावात १०० स्वयंसेवकांसाठी घरे बांधण्यास मदत केली हाेती...

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. आयुष्याची १०० वर्षे पूर्ण करणारे कार्टर हे लाेणावळाजवळच्या १०० कुटुंबीयांसाठी देवदूतच ठरले. वर्ष २००६ मध्ये कार्टर यांनी या कामगार कुटुंबीयांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास माेठी मदत केली हाेती. 

कार्टर यांनी लाेणावळाजवळच्या पाटण या गावात १०० स्वयंसेवकांसाठी घरे बांधण्यास मदत केली हाेती.  ‘हॅबिटॅट फाॅर ह्युमॅनिटी’च्या माध्यमातून ही घरे बांधण्यात आली हाेती. त्यात हाॅलिवूड अभिनेता ब्रॅड पिट आणि बाॅलिवूड अभिनेता जाॅन अब्राहम यांचेही याेगदान हाेते. २००६ मध्ये कार्टर व त्यांची पत्नी राेजलीन यांनी आठवडाभर तेथे मुक्काम केला हाेता. त्यावेळी २ हजारांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय व स्थानिक स्वयंसेवकांची उपस्थिती हाेती. कार्टर हे स्वत: सुतारकामात निपुण हाेते. या काैशल्याचा वापर त्यांनी संघटनेची प्रतिमा निर्माण करण्यासाठी केला.

भारताने अण्वस्त्रे बनविण्यास हाेता विराेधकार्टर हे भारतात आले हाेते त्यावेळी त्यांना विश्वास हाेता की,  सर्वसमावेशक अणुचाचणी बंदीच्या करारावर भारताची स्वाक्षरी मिळवून भारताच्या अण्वस्त्र सज्जतेचा मार्ग बंद करतील. मात्र, तसे झाले नाही. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान माेरारजी देसाई यांनी त्यांच्यासमाेर अशा अटी ठेवल्या की, ज्या पूर्ण करणे अमेरिकेला आजही अशक्यच आहे.

भारतात कार्टर यांच्या नावाने गावजिमी कार्टर यांच्या नावाने हरयाणात एका गावाचे नावदेखील ठेवण्यात आले आहे. गुरगावजवळच्या दाैलतपूर नशिराबाद या गावाचे कार्टरपुरी असे हे नाव ठेवण्यात आले हाेते. ३ जानेवारी १९७८ राेजी ते या गावात गेले हाेते. ही भेट अतिशय संस्मरणीय ठरली हाेती. या गावात ३ जानेवारी राेजी सार्वजनिक सुट्टी असते.

यासाठी मिळाला शांततेचा नाेबेल- जिमी कार्टर यांनी आखातात अभूतपूर्व शांतता करार घडवून आणला हाेता. १९७८मध्ये इजिप्तचे तत्कालीन राष्ट्रपती अन्वर सादात आणि इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान मेनाचेम बेगिन यांच्यात शांतता करार झाला हाेता.- ‘कॅंप डेव्हिड करार’ या नावाने ताे ओळखला जाताे. त्यानंतर कार्टर यांची शांततेचे समर्थक नेते म्हणून प्रतीमा निर्माण झाली. यासाठी त्यांना शांततेचा नाेबेल देण्यात आला होता.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत