नवी दिल्ली - अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत डील करण्यासाठी त्यांना मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत डेडलाइन दिली आहे. जर इराणने डील मानण्यास नकार दिला तर त्याला उद्ध्वस्त करू अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. मात्र याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये भारतातील अमेरिकन राजदूत यांना स्पेशल डिनरसाठी आमंत्रण दिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचवेळी भारतातील अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांना जेवणासाठी निमंत्रित करणे खूप खास आहे. परंतु अद्याप भारतातील अमेरिकन राजदूतासोबत अशाप्रकारे डिनर डिप्लोमसीचा अजेंडा काय हे स्पष्ट नाही. त्यामुळेच हा केवळ योगायोग आहे की अन्य काही धोरणात्मक रणनीती असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्जियो गोर हे अमेरिकेत गेले आहेत. सध्या सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुहेरी रणनीतीची खूप चर्चा आहे. त्यामुळे लोक या घटनेकडे केवळ योगायोग म्हणून पाहण्यास तयार नाहीत.
अमेरिकेच्या धमकीला केराची टोपली
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला प्रस्तावित करार स्वीकारा अन्यथा पुन्हा आपल्या देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त होताना पाहण्यासाठी तयार राहा अशी धमकी दिली आहे. मात्र ट्रम्प यांच्या धमकीला इराण आर्मीने केराची टोपली दाखवली आहे. ट्रम्प यांच्या धमकीतून अहंकार दिसतो असं सांगत अमेरिका आणि इस्रायली सैन्याविरोधात आमचे ऑपरेशन सुरूच राहील असं इराणने स्पष्ट सांगितले. मंगळवारी रात्रीपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्वीसारखी सुरळीत करावी. जर इराणने हे ऐकले नाही तर त्यांच्यावर खूप मोठा हल्ला करू अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. जर आम्ही मनात आणले तर १२ वाजेपर्यंत पूर्ण विध्वंस करू असं ट्रम्प यांनी म्हटलं.
४५ दिवसांच्या युद्धविरामावर सहमत नाही
अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेत एक प्रस्ताव तयार केला. त्यात सुरुवातीला ४५ दिवसांसाठी युद्धविराम करण्याची अट होती. आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव महत्त्वाचा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हे पुरेसे नाही असं विधान केले. दुसरीकडे इराणनेही तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव मान्य केला नाही. युद्धावर ठोस तोडगा निघावा असं इराणने म्हटलं. त्यामुळे दोन्ही बाजूने युद्ध संपण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत.
Web Summary : Trump's Iran deadline coincides with a White House dinner for India's envoy, fueling speculation. Iran rejects Trump's ultimatum, escalating tensions despite mediation efforts.
Web Summary : ट्रंप की ईरान समय सीमा भारत के राजदूत के लिए व्हाइट हाउस के रात्रिभोज के साथ मेल खाती है, जिससे अटकलें तेज हो गई हैं। ईरान ने ट्रंप के अल्टीमेटम को खारिज कर दिया, जिससे मध्यस्थता प्रयासों के बावजूद तनाव बढ़ गया।