शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

US-Israel-Iran war: निर्यातीचा चहा जातोय उतू.. उत्पादनाची किटली झाली थंड; भारतातून किती दशलक्ष किलो होते निर्यात.. जाणून घ्या

By अविनाश कोळी | Updated: March 6, 2026 13:15 IST

उत्पादक, निर्यातदारांच्या डोईवर संकटाचे ढग

अविनाश कोळीसांगली : आखाती देशांमध्ये भारतातून जाणाऱ्या चहाला युद्धाच्या वणव्यामुळे मोठी झळ बसली आहे. निर्यातीचा चहा उतू जात असल्याने निर्यातक्षम चहाच्या उत्पादनांची शेगडीही थंड करावी लागत आहे. एकीकडे पोर्टमध्ये अडकलेला माल निर्यातदारांना गोदामांमध्ये भरावा लागत असून, भारतातील उत्पादन आता १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आणावे लागले आहे. वाढता खर्च, अडकलेली बिले यामुळे उत्पादक, निर्यातदार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.युद्धामुळे चहाच्या व्यापाराला जोरदार दणका बसला आहे. शिपिंग मार्ग बंद झाल्याने निर्यातदारांनी त्यांचा माल आता वेअर हाऊसमध्ये शिफ्ट केला आहे. मालाची सुरक्षितता पाहताना त्यासाठीच्या खर्चाची मोठी तजवीज करावी लागत आहे. युद्ध किती दिवस चालेल, याची कल्पना नसल्याने अनिश्चिततेचे ढग भारतीय चहा व्यापारावर दाटले आहेत.जगभरात होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी मोठा हिस्सा हा मध्यपूर्व आशियातील देशातील आहे. त्यामुळे मालाच्या उत्पादनाला मोठा ‘ब्रेक’ लागला आहे. शिपिंग कंपन्यांनी प्रति कंटेनर ३,२०० रुपये आपत्कालीन सरचार्ज लावल्याने निर्यात थांबविल्याची माहिती पुणे येथील निर्यातदार श्रीधर अय्यर यांनी दिली.उलाढालीला मोठा दणकाटी बोर्ड ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारताने जगभरात २५७.८८ दशलक्ष किलो, तर २०२५ मध्ये सुमारे २८० दशलक्ष किलो चहा निर्यात केला. २०२६च्या निर्यातीचा आलेख युद्धजन्य परिस्थितीमुळे खाली घसरत आहे.

आखाती देशांत १०० दशलक्ष किलोवर निर्यातदरवर्षी भारतातून आखाती देशांमध्ये १०० ते १२० दशलक्ष किलो चहा निर्यात होतो. एकूण निर्यातीपैकी हा हिस्सा ३५ ते ४० टक्के आहे.

निर्यात होणाऱ्या चहाचे उत्पादन आम्ही सध्या १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. पोर्टमधील माल आता वेअर हाऊसमध्ये शिफ्ट केला आहे. किती काळ युद्ध चालेल, माहिती नाही. त्यामुळे खर्चाचा भार वाढत आहे. चहा उत्पादक, निर्यातदारांसाठी हा काळ मोठ्या अडचणींचा आहे. - श्रीधर अय्यर, चहा निर्यातदार, पुणेसध्या जलवाहतूक बंद झाल्याने चहाचा परदेशातील प्रवास बिकट बनला असून, आर्थिक नुकसानाला उत्पादक व निर्यातदारांना सामोरे जावे लागत आहे. दराची, बिलाची अनिश्चितताही सहन करावी लागणार आहे. -राजेशभाई शहा, सभासद, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टी ट्रेडर्स असोसिएशन

English
हिंदी सारांश
Web Title : US-Israel-Iran war hits Indian tea exports; production slows down.

Web Summary : War in the Middle East disrupts Indian tea exports. Shipments halted, costs rise, and production declines by 10-15%. Exporters face uncertainty.