शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेने वाढवला भारताचा तेलपुरवठा, भारताला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 02:55 IST

आखाती देशांतही भाव घटले : संभाव्य टंचाईला तोंड देण्याची ताकद वाढली

संतोष ठाकूर नवी दिल्ली : इराणकडून तेल खरेदीवर निर्बंध आल्यामुळे भारतात तेलाचे भाव वाढण्याची भीती असताना अमेरिकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेने भारताला जवळपास दोन दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेल निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातील संभाव्य टंचाईला मोठ्या प्रमाणावर तोंड देता येईल.

अमेरिकेकडून भारताला निर्यात वाढणार हे पाहता आखाती देशांतही तेलाच्या भावात घट व्हायला सुरुवात झाली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही अमेरिका आणि आखाती देशांतील घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत व तेलाची संभाव्य टंचाई दूर करण्यासाठी सगळ्या पर्यायांचा विचार करीत आहोत.

सूत्रांनुसार अमेरिकेने भारताला सांगितले की, गरज भासल्यास तुम्हाला दरवर्षी दोन दशलक्ष बॅरल तेल अतिरिक्त मिळू शकते. भारताने नुकतेच म्हटले होते की, इराणकडून तेल आयातीवर असलेल्या निर्बंधांमुळे आमच्या अर्थव्यवस्थेवर नकरात्मक परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अमेरिकेने इराणकडून तेल आयातीसाठी सूट द्यायला हवी. भारताने अमेरिकेलाही म्हटले होते की, तुमच्याकडून आम्हाला निर्यात वाढवावी.

अमेरिकेने भारताला अतिरिक्त २ दशलक्ष बॅरल तेल देण्यासाठी उचललेल्या पावलांना पाहता आखाती देशांनी तेलाचे भाव कमी केले आहेत. एक अधिकारी म्हणाला की, तेथे जवळपास बॅरलमागे २ डॉलर कमी आहे. हे पाहावे लागेल की ही किती टिकाऊ घट आहे. जर भावातील ही घट पुढेही बघायला मिळाली तर ते आमच्यासाठी चांगले असेल. आमचा प्रयत्न असा आहे की, आम्ही सगळ्या पर्यायी स्रोतांकडून तेल मिळवण्याचा प्रयत्न करू.

इराणकडून तेल खरेदीवरील अमेरिकेच्या निर्बंधांनंतर आम्ही सौदी अरेबिया, यूएई आणि इतर सगळ्या देशांकडून तेलाच्या अतिरिक्त खरेदीसाठी पावले उचलली आहेत. तरीही जवळपास ६-७ दशलक्ष बॅरलची कमी असेलच. या परिस्थितीत जर अमेरिकेकडून आम्हाला तेल मिळत असेल तर ते आमच्यासाठी चांगले संकेत आहेत.

हेही आहेत पर्यायरशियासोबत रुबल-रुपयात व्यवहार सुरू करण्यावर विचार. असे झाल्यास तेलाचा मोठा बाजार भारतासाठी उपलब्ध होऊ शकतो.चीनसोबतही तेल मागविण्यासाठी प्रयत्न सुरू.दक्षिण आफ्रिकी देशांकडून तेल आयात वाढविण्यावर विचार.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतPetrolपेट्रोल