शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

CoronaVirus News: कोरोना लस 'देत नाही जा' म्हणणाऱ्या अमेरिकेशी अजित डोवाल थेट बोलले, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 9:14 AM

CoronaVirus News: अमेरिकेनं कोरोना लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी उठवली; बायडन प्रशासनाचा मोठा निर्णय

वॉशिंग्टन: मागील काही दिवसांच्या आडमुठ्या भूमिकेनंतर आता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष जॅक सुलविन यांच्याशी चर्चा केली. यानंतर अमेरिकेनं लसीकरणासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला गती मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर आटोक्यात येईल. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीनं कोविशील्ड लस तयार करते. यासाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेहून येतो. मात्र अमेरिकेनं कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे लस उत्पादन अडचणीत आलं. मात्र दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी संवाद साधल्यानंतर ही निर्यातबंदी मागे घेण्यात आली. अमेरिकेनं भारताला पीपीई किट, रॅपिड टेस्टिंग कीट, ऑक्सिजन जनेरशन संदर्भात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय अमेरिकेच्या आरोग्य खात्यातील तज्ज्ञांचं पथकही भारतात येणार आहे. हे पथक भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार आहे.भारताला तातडीनं कोरोना लसींचा साठा अन् कच्चा माल पुरवा; अमेरिकन सरकारवर दबाव वाढलाभारतातील लस उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी अमेरिकेनं लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. याशिवाय अमेरिकेची डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आगामी काळात भारताला २०२२ च्या अखेरपर्यंत १०० कोटी कोरोना डोस तयार करता येतील इतक्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे. आधी 'अमेरिका फर्स्ट' भूमिका, मग दबाव वाढलाभारतानं लसीच्या कच्च्या मालासाठी अमेरिकेकडे मदत मागितली होती. पण ज्यो बायडन प्रशासनानं अमेरिका फर्स्ट अशी भूमिका घेत भारताला कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्यास असमर्थतता दर्शवली. यानंतर विविध स्तरातून अमेरिकन सरकारवर दबाव वाढला. ऍस्ट्राझेनेकासह अन्य कोरोना लसी आणि जीवनरक्षक औषधं त्वरित भारताला पाठवण्याची मागणी यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सनं केली. यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्स अमेरिकेतील शक्तिशाली संस्था मानली जाते. या संस्थेसोबतच काही अमेरिकन खासदार आणि प्रभावी भारतीय अमेरिकी व्यक्तींनीदेखील भारताला तातडीनं मदत देण्याची मागणी बायडन प्रशासनाकडे केली होती.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAjit Dovalअजित डोवालJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका